शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विवाह समारंभात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:46 IST

मुख्यमंत्र्याच्या मामेभावाच्या विवाह समारंभात चोरी करणाºया आरोपीला राजापेठ पोलिसांनी रुक्मिणीनगरातून शुक्रवारी अटक केली. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराजापेठ पोलिसांची कारवाई : २४ तासांत पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्र्याच्या मामेभावाच्या विवाह समारंभात चोरी करणाºया आरोपीला राजापेठ पोलिसांनी रुक्मिणीनगरातून शुक्रवारी अटक केली. आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीतील मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे.कुणाल राजेंद्र मिश्रा (२३, रा. नारायणनगर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असलेले अमित श्यामकांत कलोती यांचा विवाह ११ जुलै गुरुवारी बडनेरा मार्गावरील परिणय बंध लॉन येथे झाला होता. विवाह समारंभात पाहूणे म्हणून आलेल्या युवकाने नवरीला लग्नात आप्तमंडळीकडून भेटस्वरूपात मिळालेल्या पैशाच्या पाकिटावर चोरट्याने डल्ला मारला. ही बाब नवरीच्या लक्षात आल्यानंतर नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी सूत्रे फिरवून सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली. विशेष म्हणजे, कलोती परिवारातील विवाह समारंभाला मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस उपस्थित होत्या. त्यामुळे या समारंभावर पोलिसांची करडी नजर होती. तरीही आरोपीने या नवरदेव-नवरीच्या व्यासपीठाजवळ जाऊन नवरीला खाऊ एकत्रित करून ज्या पाकिटात ठेवला होता, ते लंपास करण्याचे धाडस केले. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, उपनिरीक्षक दत्ता नरवाडे, हेडकॉन्स्टेबल रंगराव जाधव, फिरोज खान, छोटेलाल यादव, किशोर अंबुलकर, राजेश गुरुले, दिनेश भिसे, सुनील ढवळे यांनी केली.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस