गुन्हे शाखेची कारवाई :
अमरावती : नागपुरी गेट हद्दीत आरोपी मोहम्मद एहसान मोहम्मद ईसाक, (३३, रा. पाकिजा कॉलनी, अमरावती) हा महेंद्र एसयूव्ही - ३०० या कंपनीच्या कार क्रमांक एमएच ३१-एफई- ६४५९ या वाहनाने आपल्याजवळ अवैधरीत्या मेथडान नावाचा अंमली पदार्थ बाळगून पाकिजा कॉलनी ते ट्रॉन्सपोर्टनगरकडे विक्री करण्याच्या इराद्याने येणार आहे, अशी खबर प्राप्त होताच त्याचे वाहन क्रमांक एमएच-३१ एफई- ६४५९ दिसून आल्याने त्याला घेराव टाकून थांबविले. पाहणीअंती त्यांचे पॅन्टच्या खिशात एक कागदी पुडी मिळून आली. त्या पुडीची चाचपणी केली असता, एकूण १५ नग प्लॉस्टिकच्या पारदर्शी लहान पन्नीत पांढऱ्या रंगाचे क्रिस्टल पाऊडर मेथडान मिळून आल्या. त्याचे वजन प्लॉस्टिक पन्नीसह १६ ग्रॅम ५३० मिली (किमत अंदाजे ८३,००० रुपये) व नगदी १५०० रुपये व एक ओपो कंपनीचा मोबाईल किंमत १०,०००/- व एक चारचाकी वाहन क्रमांक एमएच-३१-एफई-६४५९ किंमत ८,००,०००/- असा एकूण ८,९४,५००/- रुपयांचा मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेतले. आरोपीचे हे कृत्य कलम ८(क), २१(ब), २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ अन्वये होत असल्याने त्यांचेविरुध्द नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सीपी आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी केली.