शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरनुसारच व्यापारी संकुलाची दरवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

महापालिकेच्या महासभेत याविषयीवर घमासान झाले होते. प्रियदर्शिनी मार्केटची भाडेवाढ करण्याविषयी बहुतांश सदस्य आग्रही होते. याविषयी शासनाकडे मार्गदर्शन मागवून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देश सभापतींनी दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला. याबाबत जळगाव, नांदेड, वाघाळा, पुणे आदी महापालिकांच्या निर्णयाची प्रत या पत्राला जोडल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देमहापालिकेने मागितले शासनाला मार्गदर्शन : दरवाढीसाठी बहुतांश सदस्य आग्रही

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची भाडेवाढ रेडीरेकनरनुसारच करण्यात येणार आहे. यासंदर्भात महासभेत चर्चा झाल्याने प्रियदर्शिनी संकुलातील गाळ्यांच्या दरवाढीसंदर्भात महापालिकेने शनिवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना मार्गदर्शन मागितले आहे.महापालिकेच्या महासभेत याविषयीवर घमासान झाले होते. प्रियदर्शिनी मार्केटची भाडेवाढ करण्याविषयी बहुतांश सदस्य आग्रही होते. याविषयी शासनाकडे मार्गदर्शन मागवून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देश सभापतींनी दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला. याबाबत जळगाव, नांदेड, वाघाळा, पुणे आदी महापालिकांच्या निर्णयाची प्रत या पत्राला जोडल्याची माहिती आहे. या ठिकाणी निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतून झालेले आहेत, तर अमरावती महापालिकेत स्थायी समिती व सर्वसाधारण समितीच्या मंजुरीनंतर प्रस्ताव मार्गी लागले आहेत. या सर्व माहितीसह पत्र दोन दिवसांपूर्वी शासनाकडे सादर झाल्याची माहिती आहे. यापूर्वी महापालिकेच्या बडनेरा स्थित संकुलास रेडीरेकनरनुसार भाडेवाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर शहरातील मार्केटचा मुद्दा चर्चेत आला होता. महापालिकेचे उत्पन्नवाढ होण्यासाठी सर्व व्यापारी संकुलास एकच न्याय असावा, अशी मागणी महासभेच्या चर्चेत पुढे आली होती.विकसक वासुदेव खेमचंदानी यांच्यासोबत महापालिकेने येथील जयस्तंभ चौकातील १३६२.५० चौरस मीटर जागेवर व्यापारी संकुल बांधण्याकरिता करारनामा केला होता. या संकुलातील गाळ्यांचे वाटप २५ वर्षांकरिता विकसक करेल व त्याचे भाडे एक रुपया चौरस फूट दरमहा असेल, याविषयी महापालिकेने १ एप्रिल १९९३ रोजी गाळेवाटपाच्या अनुषंगाने करारनामा केला. मात्र, हा करारनामा बाजार परवाना विभागाचे अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल व रामदास डेंगरे यांच्या स्वाक्षरीचा असल्याने २३ मे २०१७ रोजीच्या स्थायी समितीच्या सभेत नियमबाह्य ठरविला गेला. त्यामुळे स्थायीने गाळ्याचे दर ६० रुपये प्रति चौरस फूट या भाड्याच्या दरास मंजुरी देण्यात आली. याविरोधात गाळेधारकांनी नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे अपील केली होती. त्यामुळे स्थायी समितीनेही ठराव २७ निलंबित करु नये, अशी विनंती महापालिकेस केली होती. ही मुदत संपुष्टात आल्याने स्थायी समितीने भाडेवाढसंदर्भात ठराव मंजूर केला; मात्र नगरविकास मंत्रालयाचे निर्देश महापालिकेला प्राप्त झाल्याने ठराव विखंडनासाठी १८ फेब्रुवारी २०१९ ला पाठविण्यात आलेला आहे. यानंतर महासभेत भाडेवाढीसंदर्भात प्रस्ताव सादर झाला. यावर शासनाचे आदेश, निर्णय व न्यायालयाचे निर्णय याबाबत शासनाकडून सविस्तर मार्गदर्शन मागवावे, असे ठरल्याने आता नगरविकास विभागाला पत्र पाठविण्यात आलेले आहे.‘स्थायी’च्या निर्णयाला सदस्यांचा विरोधप्रियदर्शिनीच्या अपिलावर तत्कालीन नगरविकास राज्यमंत्र्यांनी दुकानदारांचा प्रस्ताव प्राप्त करून प्रकरणातील यापूर्वीचे करारनामे, कायदे व नियमातील तरतुदी व प्राप्त प्रस्ताव तपासून नव्याने कारवाई करावी व आवश्यकतेनुसार शासनाचे मार्गदर्शन घ्यावे, असे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने दुकानदारांचा प्राप्त प्रस्ताव प्रथम स्थायी समितीकडे आला. त्याला ७७४ रुपये चौ.मीटर दराने मंजुरात देण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव सभेसमोर आला असतांना बहुतेक सदस्यांनी कडाडून विरोध केला.सर्व व्यापार संकुलांना एकच न्याय हवाअमरावती महानगरपालिकेचे शहरात २७ व्यापारी संकुल आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोतापैकी हा एक आहे. त्यामुळे विशेष अनुदानावर विसंबून न राहता महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करावे लागणार आहेत. त्यामुळे सर्व व्यापारी संकुलास भाड्यासाठी एकच दर लावावा, ही नगरसेवकांची मागणी कायम आहे. महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे स्रोत बळकट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.सभापतींचे निर्देशानुसार शासनाला मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. यासोबतच अन्य महापालिकांचे पत्र व न्यायालयीन निर्देश संदर्भासाठी जोडण्यात आलेले आहे.- श्रीकांत चव्हाणसहायक आयुक्तबाजार व परवाना विभाग 

टॅग्स :Socialसामाजिक