लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरधाव ट्रकच्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अकोला महामार्गावर नाकाबंदीत कर्तव्य बजावत असताना गुरुवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास लोणीनजिक ही घटना घडली. गोपाल इंगळे (३६, रा. पोलीस वसाहत, अमरावती) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.सदर कर्मचारी अमरावती ग्रामीण मुख्यालयात नायक या पदावर होता. अकोला महामार्गावरील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई रेस्टॉरंटसमोर कर्तव्यावर असतांना जि जे १९ एक्स ३६७० या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ट्रक चालक पसार झाला. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे.
अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 22:30 IST