अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 10:29 PM2020-09-03T22:29:52+5:302020-09-03T22:30:13+5:30

अमरावतीत भरधाव ट्रकच्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

Accidental death of a police officer on duty in Amravati | अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू

अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरधाव ट्रकच्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अकोला महामार्गावर नाकाबंदीत कर्तव्य बजावत असताना गुरुवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास लोणीनजिक ही घटना घडली. गोपाल इंगळे (३६, रा. पोलीस वसाहत, अमरावती) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सदर कर्मचारी अमरावती ग्रामीण मुख्यालयात नायक या पदावर होता. अकोला महामार्गावरील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई रेस्टॉरंटसमोर कर्तव्यावर असतांना जि जे १९ एक्स ३६७० या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ट्रक चालक पसार झाला. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Accidental death of a police officer on duty in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात