शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशच्या देढतलाईजवळ अपघात; चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मृत्युसंख्या सहावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:49 IST

चार चाकीचा टायर फुटल्याने झाला अपघात, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नरेंद्र जावरे

अमरावती : मेळघाटच्या धारणीला लागून असलेल्या अकोट पफिसरातून काम करून गावी जाणाऱ्या मजुरांचा मध्यप्रदेशातील देडतलाई शेखपुरा येथे बुधवारी दुपारी  २;३० वाजता अपघात झाला होता. त्यात पाच जण ठार तर आठ जखमी झाले. तर, गुरुवारी चार वर्षे चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी खकणार पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून महाराष्ट्रातील पिकअप व्हॅनसह दोन्ही वाहनांचे चालक घटनास्थळावरून फरार आहेत.

दारासिंग श्रीराम (४ वर्ष) सुंदरबन असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जणांवर मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. ध्यप्रदेशच्या बराणपूर खंडवा बैतूल जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी मजूर रोजगारासाठी अमरावती अकोला बुलढाणा परिसरात शेतीकाम, कापणीसह इतर कामांसाठी येतात. दोन महिन्यांपूर्वीसुद्धा करजगाव येथून जाणाऱ्या चार चाकी वाहनाची खासगी बस सोबत धडक झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील सर्व मृतक मध्यप्रदेशातील होते.

चार चाकीचा टायर फुटल्याने अपघात

अकोट परिसरातून निघालेल्या एम एच ४८ टी ४५०९ क्रमांकाची चार चाकी पिकअप मजुरांना घेऊन जात असताना उसाच्या ट्रकल ओव्हरटेक करताना वळणावर टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती खकणार पोलिसांनी लोकमत शी बोलताना दिली त्यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला तर सात जखमींवर उपचार सुरू आहेत

ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दोन्ही चालक फरार

भीषण अपघातानंतर ट्रक आणि पिकअप वाहनाचा चालक दोघेही फरार आहेत घटनेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा ते घटनास्थळी किंवा पोलिस ठाण्यात पोहोचले नाहीत खकनार पोलिसांनी एम पी शून्य नऊ के डी १७ २३ क्रमांकाच्या ट्रक चालका विरुद्ध २८९, ३३७, ३०४ अ  अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सिंग यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली

अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वळणावर चार चाकी चा टायर फुटल्याने हा अपघात झाला त्या वाहनाच्या मालकासह चालकाचा शोध सुरू आहे.

- संजय पाठक ठाणेदार, खकणार मध्य प्रदेश

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती