लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नीलगाय आडवी गेल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या शासकीय वाहनाला २४ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा चांदूररेल्वे मार्गावरील बासलापूर गावाजवळ अपघात झाला. यामध्ये झेडपी अध्यक्ष थोडक्यात बचावले.जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे हे त्यांच्या यांच्या दिमतीला असलेले शासकीय वाहन क्रमांक एम.एच. २७ ए.ए.७० ने २४ आॅगस्ट रोजी रात्री १ वाजता त्यांच्या पळसखेङ या गावी जात होते.यावेळी त्यांच्यासोबत चालकही होते. दरम्यान अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील बासलापूर गावानजीक अंधारात नीलगायीचा कळप रस्ता ओलांडत असताना एका नीलगायीने अचानक वाहनाकडे धाव घेत थेट वाहनाला धडक दिली. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे. यावेळी अध्यक्ष नितीन गोंडाणे व वाहनचालक सुजय ठाकरे वाहनात होते. मात्र, अपघातातून ते दोघेही थोडक्यात बचावले.याघटनेची तक्रार वाहनचालक सुजय ठाकरे यांनी चांदूररेल्वे पोलिसांत नोंदविली आहे.तसा अहवाल चालकाने जिल्हा परिषद सामान्य प्रशासनन विभागाला दिला आहे. झेडपी अध्यक्षांच्या वाहनाला झालेल्या या अपघाताची परिसरात गुरूवारी सर्वत्र चर्चा होती.
जि.प.अध्यक्षांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 23:42 IST
नीलगाय आडवी गेल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या शासकीय वाहनाला २४ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा चांदूररेल्वे मार्गावरील बासलापूर गावाजवळ अपघात झाला.
जि.प.अध्यक्षांच्या वाहनाला अपघात
ठळक मुद्देथोडक्यात बचावले : चांदूररेल्वे मार्गावरील घटना