शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील तिवसा येथे तीन महिन्यांपासून 'आपला दवाखाना' बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 12:54 IST

Amravati : रुग्ण आरोग्य सुविधेपासून वंचित, रजेवर गेलेले डॉक्टर बेपत्ता पदेही आहेत रिक्त

संदीप राऊतलोकमत न्यूज नेटवर्क तिवसा : मुंबईसह संपूर्ण राज्यात शिंदे सरकारने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही आरोग्य योजना सुरू केली आहे. त्यानुसार २५ ते ३० हजार लोकसंख्येच्या ठिकाणी एक दवाखाना सुरू करण्यात आला. तिवसा येथील दवाखान्यात गेल्या तीन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. आपलाच दवाखाना आता आपला राहिला नसल्याची भावना नागरिकांमध्ये दृढ होऊ लागली आहे. 

शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना कार्यान्वित केली आहे. आपला दवाखान्यात एकूण १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात प्राथमिक उपचाराशिवाय येथे अन्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना शासकीय रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. शासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपला दवाखाना ही आरोग्यदायी योजना सुरू केली असली तरी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचा ताळमेळ नसल्यामुळे आपला दवाखाना शोभेची वस्तू ठरत आहे. तिवसा शहरातील आपला दवाखाना गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडला असून एक महिन्याच्या रजेवर गेलेले येथील वैद्यकीय अधिकारी तीन महिने लोटून अद्यापही दवाखान्यात परतले नाहीत. त्यामुळे शासनाने सुरू केलेली ही आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

नागरिकांमध्ये संभ्रमआपला दवाखान्यात योग्य उपचार होत नसून प्रत्येक रुग्णाला एकाच प्रकारचे औषधी देण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या दवाखान्याकडे पाठ फिरवून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती स्थानिकांकडून प्राप्त झाली आहे.

या सुविधा नावालाच आपला दवाखान्यात तज्ज्ञांअभावी कान, नाक, घसा, त्वचारोग, हाडासंबंधी उपचार, नेत्र चिकित्सा, दंतशल्य चिकित्सा, बालरोग, स्त्रीरोग अशा विविध आरोग्य सुविधा पुरविण्याची तरतूद असली तरी; पण उपरोक्त्त सुविधा पुरविण्यात आपला दवाखाना अपयशी ठरत आहे.

"आपला दवाखानामध्ये ११ महिन्यांच्या करारावर कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात येतात. त्यामुळे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळत नाही. तिवस्याला नवीन वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी लवकरच मुलाखती घेतल्या जातील."- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

टॅग्स :Amravatiअमरावती