शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टावर ओळख, लग्नाचे आमिष अन् अत्याचार करून रफुचक्कर; अमरावतीमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 19:07 IST

अमरावती : इन्स्टाग्रामवर झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीचे सर्वस्व हिरावून गेली. मूळच्या परभणी येथील असलेल्या त्या अल्पवयीन मुलीवर हिंगोली ...

अमरावती : इन्स्टाग्रामवर झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीचे सर्वस्व हिरावून गेली. मूळच्या परभणी येथील असलेल्या त्या अल्पवयीन मुलीवर हिंगोली बायपास व अमरावतीमधील एका हॉटेलमध्ये अतिप्रसंग करण्यात आला. तिलाच अमरावतीच्या त्या हॉटेलमध्ये सोडून तो एकटाच रफुचक्कर झाला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी अशफाक पठाण अहमद खान (रा. हिंगोली) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), ४१७, व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, पीडितेची सुमारे वर्षभरापूर्वी आरोपीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपीने चॅटिंग करून फिर्यादीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपी हा त्याच्या एम एच ३८ व्ही ९२७४ या चारचाकी वाहनाने फिर्यादीच्या राहते घरी परभणी येथे पोहोचला. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तिला कारमध्ये बसवून हिंगोली येथे वाशिम बायपास रोडलगत निर्जनस्थळी घेऊन गेला. तेथे ‘मैं तुझसे बहोत प्यार करता हूँ, मै तुझसे शादी करुंगा, मुझे तुझसे बच्चा होना, असे म्हणून त्याने वाहनातच तिच्यावर अतिप्रसंग केला. तिला कारने न सोडता त्याने तेथेच तिच्याशी वाद घातला. तिला परभणीच्या एसटीत बसून दिले. त्यानंतरही फोनवरुन सतत लग्नाचे आमिष दाखवून तिला वाशिम बायपासवर नेऊन तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नास नकार देऊन त्याने आपला विश्वासघात केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावती