शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतात गुरे चारण्याच्या पैशांवरून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 23:39 IST

पोलीस सूत्रांनुसार, ईश्वर रमेश चव्हाण (३२, रा. जामली आर) असे मृताचे नाव आहे. हत्येप्रकरणी आरोपी  हिरालाल रामा जामूनकर (५९, रा. जामली आर) याच्यासह  पत्नी सोमती हिरालाल जामूनकर (४७) व मुलगा संजूलाल हिरालाल जामूनकर (३०) यांना चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ईश्वरचा मृतदेह हिरालालच्या घरी खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : शेत गुरे चराईसाठी दिले, त्याचे सातशे रुपये दिले नसल्याच्या वादातून दारूच्या नशेत कुऱ्हाडीने डोक्यासह तोंडावर सपासप वार करून गुरे चारणाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील जामली आर गावात सकाळी ११ वाजता घडली. या घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रांनुसार, ईश्वर रमेश चव्हाण (३२, रा. जामली आर) असे मृताचे नाव आहे. हत्येप्रकरणी आरोपी  हिरालाल रामा जामूनकर (५९, रा. जामली आर) याच्यासह  पत्नी सोमती हिरालाल जामूनकर (४७) व मुलगा संजूलाल हिरालाल जामूनकर (३०) यांना चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ईश्वरचा मृतदेह हिरालालच्या घरी खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ईश्वर चव्हाण हा गवळी समाजाचा असून, त्याचा दूध व पशुपालनाचा व्यवसाय आहे. आरोपी हिरालाल जामूनकर याचे शेत त्याने पाळीव गुरांच्या चराईसाठी सातशे रुपयांत घेतले होते. ही रक्कम मागितल्यावरसुद्धा दिली नसल्याने दोघांमध्ये वाद झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोघे दारूच्या नशेत असताना आरोपी हिरालालने कुऱ्हाडीने वार करून ईश्वरची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी रूपनर, उपनिरीक्षक दिनेश तायडे, जमादार विनोद इसळ, प्रभाकर चव्हाण, अर्जुन केंद्रे, श्रीकांत खानंदे, आनंद देवकते, आशिष वरघड, संदीप देवकते आदींच्या चमूने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व आरोपींना अटक केली. 

परिजनांचा आक्रोश, दोन मुले पित्याला मुकलीहत्या झाल्याचे कळताच घटनास्थळी गावातील व परिसरातील नागरिकांनीही एकच गर्दी केली होती. परिजनांचा आक्रोश होता. मृतक ईश्वर चव्हाण याला आठ व दहा वर्षाची दोन मुले आहेत.

सोयाबीन विकून आला ईश्वरईश्वर चव्हाण हा गुरुवारी अचलपूर बाजार समितीत सोयाबीन विकून आला होता. त्याचे पैसे त्याच्याजवळ होते. यामुळे वाद पैशांवरून की अन्य काही कारण, यासंदर्भात पोलीस तपास करीत आहेत.

कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी माझ्या देखरेखीत पंचनामा करण्यात आला. हत्येच्या कारणांचा शोध सुरू असून, आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.- शहाजी रूपनर, सहायक पोलीस निरीक्षक, चिखलदरा

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी