शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...

By गणेश वासनिक | Updated: September 13, 2025 15:06 IST

Amravati : महापालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी ‘मीट द प्रेस’मध्ये उलगडला जीवनप्रवास

अमरावती : घरात आजोबा, आई-वडील आणि भाऊ, अशी डॉक्टरांची फौज होती. एवढेच नव्हे, तर आजी प्राचार्य होती. कुटुंबातील अनेकांना वाटायचे की मीसुद्धा डॉक्टर व्हावे. पण नियतीच्या मनात काही औरच होते. विधी पदवीच्या अभ्यासक्रमात प्रवेश असताना, शेवटच्या वर्षात यूपीएससी परीक्षा दिली अन् पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन आयएएस झाली, असा आगळावेगळा जीवनप्रवास अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी शुक्रवारी ‘मीट द प्रेस’मध्ये बोलताना उलगडला.

मूळ दिल्ली येथील रहिवासी असलेल्या सौम्या शर्मा यांचे पती अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक हे आहेत. हैद्राबाद येथील प्रशिक्षण काळात अर्चित चांडक यांच्याशी भेट झाली नि कालातंराने या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे लग्नबंधनात अडकले. त्यांंना एक मुलगा आहे. आईकडून प्रेरणा मिळाली. वृत्तपत्र वाचनाची आधीच गोडी होती. त्यातच विधी अभ्यासक्रमाचा आधार या सर्व घडामोडी यूपीएससीची तयारी करताना कामी आल्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्यासाठी ‘नीट’साठी अर्ज केला. पण परीक्षा दिली नाही. परंतु कुटुंबीयांशी चर्चा करून २ जून २०१७ मध्ये यूपीएससी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार लोकसेवेत जाण्याचा मार्ग निवडला. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी एआयआर रँक घोषित झाले. २०१९ ते २०२२ या दरम्यान दिल्ली येथे एसडीजीएम म्हणूनकोरोना काळात कारभार हाताळला. नंतर महाराष्ट्र कॅडेर मिळाले. २०२२ मध्ये नांदेडच्या देगलुर येथे पहिली पोस्टींग मिळाली. त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात सीईओ आणि आता १७ जून २०२५ पासून अमरावती महापालिका आयुक्तपदाची धुरा सांभाळत आहेत. आयएएस झाली तेव्हा अवघ्या २२ वर्षांची होते, असे त्यांंनी सांगितले. जे चांगले ते माझ्यासाठी आदर्श आहे, असे आयुक्त शर्मा म्हणाल्या.

स्वच्छता, स्मशानभूमी, उद्यानावर फोकस

अमरावती महानगरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे, तो प्राधान्याने सोडविण्याचे अभिवचन त्यांनी दिले. तसेच घनकचरा व्यवस्थापन, उद्यानाचा विकास, आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे, छत्री तलावाचा विकास, शाळांचा सुधार, हॉकर्स झाेन, वाहनतळ, पे ॲन्ड पार्क, मनुष्यबळासह अन्य प्रश्न, समस्यांवर आयुक्त शर्मा यांचा फोकस होता.

टॅग्स :Amravatiअमरावतीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग