शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बांबू कटाईसाठी गेलेल्या युवकाला वाघाने केले ठार, हरिसाल परिक्षेत्रातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 10:12 IST

Amravati News: जंगलात वडील, काकांबरोबर बांबू आणण्यासाठी गेलेल्या आदिवासी युवकावर वाघाने हल्ला करीत ठार केले. रविवारी दुपारी १२ वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेने हरिसाल, केसरपूर पंचक्रोशीत दहशत पसरली आहे.

चिखलदरा (अमरावती) - जंगलात वडील, काकांबरोबर बांबू आणण्यासाठी गेलेल्या आदिवासी युवकावर वाघाने हल्ला करीत ठार केले. रविवारी दुपारी १२ वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेने हरिसाल, केसरपूर पंचक्रोशीत दहशत पसरली आहे. वाघाला जेरबंद किंवा ठार करा, या मागणीसाठी परिसरातील पाचशेवर आदिवासींनी ठिय्या आंदोलन चालविले आहे. या दरम्यान, जंगलातून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  

हरिराम गंगाराम धिकार (३२, रा.केसरपूर, ता.चिखलदरा) असे  ठार झालेल्याचे नाव आहे. तो वडील गंगाराम धिकार व काका चिंताराम धिकार यांच्यासह रविवारी सकाळी ९ वाजता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत हरिसाल वनपरिक्षेत्रातील माताखोल जंगलात बांबू आणण्यासाठी गेला होता. हरिराम न आल्याने वडील आणि काका त्याला शोधण्यासाठी जंगलात गेले. काही अंतरावर त्यांना जमिनीवर धड ओढत नेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गावातील आदिवासी बांधवांना आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. सर्व जण जंगलात गेले. तेथे हरिरामचा मृतदेह आढळला. व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. 

वाघाला जेरबंद करा; आदिवासींचा ठिय्या- चिखली आणि परिसरात यापूर्वीही वाघाने जंगलात व घरात शिरून आदिवासींना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत.- त्याची पुनरावृत्ती रविवारी झाल्याने परिसरातील हरिसाल, चिखली, कारा, नांदुरी, केसरपूर, भिरोजा, चित्री, तारूबांदा परिसरात एकच दहशत पसरली आहे. माताखोल येथे पंचक्रोशीतील ५०० पेक्षा अधिक आदिवासींनी गर्दी केली होती.- वाघाला जेरबंद करा किंवा ठार करा, अशी मागणी करीत आदिवासी एकवटले होते.

  जंगलात एका आदिवासीचा मृतदेह आढळून आला. त्याबाबत पूर्ण तपास सुरू आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे. - सुमंत सोळंके, उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा.

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती