शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'शिवशाही'पेक्षा लाल डबा परवडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:55 IST

Amravati : पडदे घाणेरडे, सीसीटीव्ही, चार्जर बंद; प्रवाशांना मिळेनात सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : किफायतशीर दरात दर्जेदार प्रवास सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बस आणल्या होत्या. मात्र, अल्पावधीतच या शिवशाही बस भंगार झाल्या आहेत. अमरावती विभागात महामंडळामार्फत ३९ शिवशाही बस प्रवासी सेवेत चालविल्या जातात. यापैकी अनेक बसची अवस्था दयनीय आहे. बरेचदा शिवशाही बस प्रवासe दरम्यान वाटेतच बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवशाही बसमध्ये सुरुवातीला प्रवाशांकरिता असलेल्या सोयीसुविधांचा पार बोजवारा उडाला आहे. बऱ्याच बसची अवस्था भंगार झाली आहे. शिवशाही बसेसमधील पडदे घाणेरडे झाले आहेत. याशिवाय सीसीटीव्ही, चार्जरची सुविधा अल्पावधीतच बंद पडलेली आहे. वारंवार बसमध्ये तांत्रिक बिघाडाचे प्रकारही वाढल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

सीसीटीव्ही चार्जर बंद शिवशाही बसेस ज्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या तेव्हा या बसेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाइल चार्जिंगसाठी चार्जर स्वीच बसविले होते. मात्र, अल्पावधीत सीसीटीव्ही व चार्जर बंद पडले आहे. अशातच आता तर शिवशाही बसमध्ये या सोई सुविधा दिसेनाशा झाल्या आहेत.

खुर्थ्यांची स्थिती वाईट शिवशाही बसेसमध्ये प्रवाशांकरिता टू बाय टू अशी आसन व्यवस्था आहे. मात्र सध्याच्या अमरावती विभागातील बहूतांश शिवशाही बसेसमधील खुच्र्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून सुरुवातीला या बसेसमध्ये प्रवाशांना मिळणारा आरामदायी प्रवास दुर्लभ झाला आहे. खुर्थ्यांची काही बसेसमध्ये फाटलेल्या आहेत.

एसीमध्ये कोंबलेले कागदउन्हाळयाच्या दिवसांत अतिशय थंड वातावरणात प्रवाशांना प्रवास करायचा झाला तर बहुतांश प्रवासी हे शिवशाही बसेसला प्राधान्य द्यायचे. या बसेसमध्ये एसीची सुविधा होती. आता मात्र अनेक बसेसमधील एसी बंद पडले आहेत. तर काही एसीमध्ये कागद कोंबले असल्याचे चित्र दिसून आले.

प्रवासी म्हणतात...शिवशाही बसेदमध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या होत्या, मात्र आता शिवशाही बसची अवस्था भंगार बससारखी झाली आहे.- रवींद्र बागडे, प्रवासी

शिवशाही बस आवडीने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पसंती देत होतो. या बस प्रवासी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, मोबाइल चार्जर, एसी यांसारख्या सुविधा मिळत होत्या, मात्र आता यापैकी एकही सुविधा मिळत नाही.- अभिषेक कावरे, प्रवासी

शिवशाही बसमध्ये प्रवाशांच्या सोईसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यापैकी काही सुविधा बंद असल्या, तरी त्या दुरुस्ती केल्या जातात. शिवाशाही बस नियमित स्वच्छता व देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महामंडळ नेहमीच प्रयन्नशील असते. - नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

टॅग्स :Amravatiअमरावती