शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वाहनाला रेती टिप्परने ठोकरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 23:45 IST

पोलिस सूत्रांनुसार, अमोल वासुदेव इंगळे (३०, रा. ब्राह्मणवाडा थडी) असे मृताचे नाव आहे. ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्याचे नायक पोलीस कॉन्स्टेबल मंगेश पेठे, कॉन्स्टेबल अनूप मानकर यांनी आरोपी विजय दीपक वानखडे ऊर्फ लल्ला (२५, रा. बुंदेलपुरा, अचलपूर) याला जेरबंद करण्यासाठी खासगी वाहन भाड्याने घेतले होते. तो नागपुरात असल्याची माहिती पोलिस ठाण्याला प्राप्त झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणवाडा थडी/मोर्शी : आरोपीला नागपूरहून अटक करून आणण्यासाठी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी भाड्याने घेतलेल्या खासगी वाहनाला अपघात होऊन चालकाचा मित्र ठार झाला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर या वाहनाला रेती वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.पोलिस सूत्रांनुसार, अमोल वासुदेव इंगळे (३०, रा. ब्राह्मणवाडा थडी) असे मृताचे नाव आहे. ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्याचे नायक पोलीस कॉन्स्टेबल मंगेश पेठे, कॉन्स्टेबल अनूप मानकर यांनी आरोपी विजय दीपक वानखडे ऊर्फ लल्ला (२५, रा. बुंदेलपुरा, अचलपूर) याला जेरबंद करण्यासाठी खासगी वाहन भाड्याने घेतले होते. तो नागपुरात असल्याची माहिती पोलिस ठाण्याला प्राप्त झाली होती. त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण, विनयभंग व पॉस्कोचा गुन्हा दाखल होता.  भाड्याने घेतलेल्या खासगी वाहनाचा चालक अक्षय ऊर्फ गोलू पोकळे याने त्याचा मित्र अमोल (दोघेही रा. ब्राह्मणवाडा थडी) यालाही सोबत घेतले होते. आरोपीला  नागपुरातून ताब्यात घेऊन रात्री परत येत असताना गुरुवारी रात्री १ च्या सुमारास हिवरखेड ते मोर्शीदरम्यान रेती वाहून नेणाऱ्या दहाचाकी ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात वाहन चकनाचूर झाले. या धडकेत अमोलचा जागीच मृत्यू झाला. चालक अक्षय व आरोपी विजय हे अपघातातून बचावले, तर मंगेश पेठे व अनूप मानकर यांना किरकोळ मार लागला. 

 

टॅग्स :Accidentअपघात