शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दहा रुपयांच्या शाईसाठी २३ लाखांचा भुर्दंड; विद्यापीठाच्या उधळपट्टीचा अजब नमुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 10:57 IST

Amravati : सुरक्षा भिंत बांधण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठाच्या फंडाला तब्बल २३ लाखांनी चुना

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : तीन-चार वर्षांपूर्वी परीक्षा संचालकांच्या टेबलवर झालेल्या शाईफेक प्रकरणाची धास्ती घेऊन परीक्षा विभागाला पक्की सुरक्षा भिंत बांधण्याचा अजब निर्णयामुळे विद्यापीठाच्या फंडाला तब्बल २३ लाखांनी चुना लागल्याची बाब गत आठवड्यात संपन्न झालेल्या सिनेट समक्ष उघड झाली आहे.

परीक्षा विभागाच्या इमारतीला भक्कम अशी सुरक्षा भिंत बांधण्यामागचा उद्देश आणि त्यावर झालेल्या खर्च व उपयोगिता यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना ही भिंत बांधण्याकरिता तब्बल २३ लाख खर्च झाल्याची बाब उघड झाली आहे. या प्रश्नावर बोलताना प्रा. डॉ. कुटे यांनी सभागृहाला सांगितले की, त्यांच्या महाविद्यालयात याच प्रकारची भिंत बांधण्याकरिता आठ ते नऊ लाख खर्च आला. मग विद्यापीठाला २३ लाख कसे लागले? असे कोणते मटेरियल वापरले? यावर उत्तर देताना विद्यापीठ अभियंत्यांनी सांगितले की, एकूण ३२ लाखांचे प्रस्तावित बांधकाम होते. परंतु, प्रत्यक्षात २३ लाखांत काम झाले. या कामासाठी सर्व प्राधिकारणीसमक्ष विषय सादर करण्यात आला होता. सदस्यांच्या प्रत्येक प्रश्नाला अभियंत्यांनी सखोलपणे उत्तर दिले. या चर्चेत डॉ. विधे, डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी भाग घेतला. भिंतीची उपयोगिता काय? खरोखर प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी होते का? भिंत बांधल्याने मोर्चे थांबले का? भिंत बांधल्याचा उद्देश सफल झाला का? या प्रश्नावर प्रशासन मात्र निरुत्तर होते, हे विशेष. 

परीक्षा विभाग सगळ्यांसाठी खुला कुलगुरूंनी विद्यमान परीक्षा संचालक डॉ. नितीन कोळी यांना मत व्यक्त करण्यास सांगितले असता त्यांनी 'कोणालाच आडकाठी नाही. परीक्षा विभाग सगळ्यांसाठी खुला आहे,' असे प्रतिपादन करीत चर्चेवर पडदा टाकला. मात्र, सगळ्यांसाठी खुल्या असलेल्या परीक्षा विभागास सुरक्षा भितीची खरंच गरज होती का? अशी चर्चा विद्यापीठात रंगली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठAmravatiअमरावती