शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अमरावती ग्रामीण पोलिस मुख्यायातून ‘ते’ शासकीय वाहन हटविले 

By गणेश वासनिक | Updated: April 9, 2024 21:04 IST

निवडणूक विभागाने घेतली दखल, मोर्शी सामाजिक वनीकरणाच्या आरएफओंचा प्रताप उघड

अमरावती : सामाजिक वनीकरण विभागाच्या मोर्शी आरएफओंच्या ताब्यातील वाहन हे अमरावती येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयात ‘शासकीय वाहन लपविले, आयोगाच्या हातावर दिल्या तुरी’ या आशयाचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने छायाचित्रासह प्रकाशित करताच हे वाहन आरएफओंनी त्वरेने तेथून हटविले आहे. मात्र हे शासकीय वाहन आता कुठे नेले? या प्रश्न अनुत्तरीत आहे. परंतु, या गंभीर प्रकरणाची निवडणूक विभागाने दखल घेतली असून याबाबत सामाजिक वनीकरणाला जाब विचारला जाणार असल्याची माहिती आहे.

सामाजिक वनीकरण मोर्शी परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकारी शीतल घुटे यांच्याकडे असलेले एमएच २७, एए ०४९७ या क्रमांकाचे वाहन निवडणूक विभागाच्या तावडीतून वाचविण्यासाठी त्यांचे पती कार्यरत असलेल्या मोटार परिवहन विभागाच्या ग्रामीण मुख्यालय येेथे १२ दिवसांपूर्वी आणून लपविले होते. निवडणूक विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत मोर्शी आरएफओंनी शक्कल लढविली. तर दुसरीकडे हे वाहन नादुरूस्त असल्याचा बनाव करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कार्यात वाहन आवश्यक असल्याने हे वाहन अधिग्रहीत करण्यासाठ सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनाधिकारी शरद करे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र हे वाहन निवडणूक विभागाला नादुरूस्त आणि चालक नसल्याचे कारण सांगून देण्याचे टाळले. मात्र वाहन सुस्थितीत असताना केवळ निवडणूक कामासाठी वाहन देण्याचे टाळून चक्क ते आरएफओंनी अमरावतीच्या ग्रामीण पोलिस मुख्यालयात आणून ठेवले. तथापि, पोलिस मुख्यालयात पोलिसांचीच वाहने ठेवली जात असताना सामाजिक वनीकरणाचे वाहन कशासाठी ठेवले, हा प्रश्न कायम आहे.

सामाजिक वनीकरणाचे विभागीय अधिकारी अनभिज्ञमोर्शी आरएफओंनी परस्पर शासकीय वाहन ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात आणून ठेवल्याच्या या धक्कादायक प्रकारापासून सामाजिक वनीकरण विभागीय अधिकारी शरद करे हे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. सामाजिक वनीकरण, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अथवा प्रादेशिक वन विभागात मुबलक जागा असताना ग्रामीण पोलिस मुख्यालयात शासकीय वाहन कशासाठी ठेवण्यात आले, याची चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलिस मुख्यालयातून वाहन हलविलेमोर्शी आरएफओंनी वरिष्ठांची परवानगी न घेता शासकीय वाहन हे ग्रामीण मुखयालयात आणून लपविले होते. ही बाब लोकमतनेउजेडात आणताच बुधवारी हे वाहन हलविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे वाहन कुठे नेले, याबाबत संशय निर्माण हाेत आहे. गत १२ दिवसांपासून हे शासकीय वाहन लपवून ठेवले असताना आता मोर्शी आरएफओंच्या वाहनांचे लॉग बुक तपासणी करणे हे गरजचे आहे. चालक नसताना हे वाहन मोर्शी येथून अमरावतीपर्यत कोणी चालवित आणले, हा विषय संशोधनाचा आहे. आता एक-दोन दिवसात हे वाहन खासगी गॅरेजमध्ये दिसून आल्यास नवल वाटू नये, असे बोलले जात आहे.