शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती महापालिकेत आयुक्तपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ; नवनियुक्त कापडणीसांनी पदभार स्वीकारला

By गणेश वासनिक | Updated: March 15, 2024 19:49 IST

महानगरपालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवरून ‘राज’कारण सुरू झाले आहे.

अमरावती: महानगरपालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवरून ‘राज’कारण सुरू झाले आहे. आयुक्त देवीदास पवार यांची गुरुवारी नगरविकास विभागाने बदलीचे आदेश जारी केले, तर नवे आयुक्त म्हणून नितीन कापडणीस यांच्याकडे अमरावती महापालिकेची धुरा सोपविली. मात्र देवीदास पवार यांची अचानक झालेली बदली त्यांच्या जिव्हारी लागली आणि शुक्रवारी त्यांनी ‘मॅट’मधून स्थगनादेश आणला. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार स्वीकारला असला तरी ‘मॅट’च्या निर्णयामुळे ‘आ अब लौट चले’, असे चित्र आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नितीन कापडणीस यांची गुरुवारी नगरविकास विभागाने नियुक्ती केली आहे. कापडणीस हे मुंबई येथील नगर परिषद प्रशासन संचालनालयात उपायुक्तपदी कार्यरत होते. मात्र आयुक्त देवीदास पवार यांना १४ मार्चपासून कार्यमुक्त होण्याचे आदेश होते. पवार यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असे शासन आदेशात नमूद होते. मात्र पवार यांनी शासन आदेशाला आव्हान देत शुक्रवारी ‘मॅट’मधून तीन आठवड्यांसाठी बदलीला स्थगनादेश मिळवला आहे. ‘मॅट’च्या आदेशामुळे देवीदास पवार हे अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी पुढील आदेशापर्यंत कायम राहतील, अशी माहिती आहे. ‘मॅट’चा निर्णय आणि शासन आदेशाचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे. अमरावतीत काहीतरी चांगले काम करण्याची इच्छा होती. भानगड करणे हे माझ्या स्वभावात नाही. जो काही निर्णय होईल, ते मान्य असेल. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला असला तरी ‘मॅट’च्या निर्णयामुळे मी परत जात आहे. - नितीन कापडणीस, नवनियुक्त आयुक्त, अमरावती महापालिका

टॅग्स :Amravatiअमरावती