शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विधवेला दाखविले लग्नाचे स्वप्न; ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करत स्वप्नभंग!

By प्रदीप भाकरे | Updated: June 1, 2023 13:19 IST

अविवाहित असल्याची बतावणी : धारणी, चिखलदऱ्यात केले लैंगिक शोषण

अमरावती : अविवाहित असल्याची बतावणी करून एका विधवेला विवाहाचे प्रलोभन देण्यात आले. त्यातून तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धारणी येथे उघड झाला आहे. आरोपीचे खरे रूप उघड होताच तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्नसंबंध जुळविला असता आरोपीने तिचे अश्लिल व्हिडिओ तिच्या होणाऱ्या पतीसह त्याच्या भावाला देखील पाठविले.

याप्रकरणी, धारणी पोलिसांनी ३१ मे रोजी रात्री ९ नंतर आरोपी साजिद शेख सलिम शेख (३६, रा.धारणी) याच्याविरूद्ध बलात्कार व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. २३ जून २०२२ ते ३१ मे २०२३ दरम्यान शारीरिक कुकर्माची ती मालिका चालली. तक्रारीनुसार, पिडित २६ वर्षीय महिला ही विधवा आहे. गतवर्षी जूनच्या सुमारास तिची आरोपी साजिद शेखशी ओळख झाली. दरम्यान आपण अविवाहित असून तुझ्यावर प्रेम असल्याने तुझ्याशी लग्न करणार आहोत, अशी बतावणी त्याने विधवेकडे केली. तिलाही सशक्त आधाराची गरज असल्याने व तो अविवाहित असल्याने तिने देखील त्याच्या प्रेमाला होकार दिला.

दरम्यान त्याने तिला लग्नाचे आमिष देत धारणी येथील एका दुकानात तिचे लैंगिक शोषण केले. तो तिला चिखलदऱ्याच्या हॉटेलमध्ये देखील घेऊन गेला. तेथे देखील त्याने तिचे सर्वस्व लुटले. दरम्यानच्या काळात आरोपी साजिद शेख हा विवाहित असल्याची माहिती पिडिताला मिळाली. आरोपीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पिडिता स्वत:हून त्याच्यापासून दूर गेली. तथा तिने अन्य व्यक्तीशी लग्न करायचे ठरविले.

महिला पोलिसांकडे आपबिती

पिडिता ही आपल्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करणार असल्याची कुणकुण आरोपीला लागली. त्यामुळे त्याने पिडिताचे तिच्या नकळत काढलेले तिचे अश्लिल व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीला व त्याच्या भावाला व्हाॅट्सॲपवर पाठविले. त्यामुळे तिचा पुन्हा स्वप्नभंग झाला. ही बाब माहिती होताच पिडिताने ३१ मे रोजी रात्रीच्या सुमारास धारणी पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला पोलिसांनी तिची आपबिती ऐकून घेऊन आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून बुधवारी रात्री आरोपीविरूद्ध बलात्कार व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा नोंदविला. आरोपीला तातडीने अटक केली.

- सुरेंद्र बेलखडे, ठाणेदार, धारणी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती