शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दहा महिन्यात एमपीडीएचे दशक, कुख्यात बिट्टू वर्षभरासाठी कारागृहात

By प्रदीप भाकरे | Updated: October 25, 2024 13:02 IST

अजून तिघे रडारवर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन

प्रदीप भाकरे अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून फ्रेजरपुरा हद्दीतील कुख्यात गुन्हेगार रूपेश ऊर्फ बिटटु विनोद वानखडे (२३, रा. पंचशील नगर) याच्याविरूध्द एमपीडीएची कारवाई करण्यात आली. त्याला २४ ऑक्टोबर रोजी वर्षभरासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षात दहा जणांविरूध्द एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून, अन्य तिन ते चार जण पोलिसांच्या रडारवर आहेत.             

कुख्यात गुन्हेगार रूपेश ऊर्फ बिटटु विनोद वानखडे हा सन २०२२ पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याच्याविरूध्द फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अश्लील शिवीगाळ, गंभीर दुःखापत, गृह अतिक्रमण, घातक शस्त्र बाळगणे, अधिसुचना व हद्दपार आदेशाचे उल्लघंन असे एकुण १६ गुन्हे दाखल आहे. त्याच्याविरूध्द यापुर्वी प्रतिबंधक कारवई करण्यात आली. त्याला तडीपार सुध्दा करण्यात आले होते. तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने त्याच्याविरूध्द फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार निलेश करे यांनी एसीपी कैलास पुंडकर, उपायुक्त सागर पाटील व कल्पना बारवकर यांच्या मार्फत पोलीस आयुक्तालयात एमपीडीएचा प्रस्ताव पाठविला. एसीपी शिवाजी बचाटे व पोलीस निरिक्षक सिमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील एमपीडीए सेलमधील सहायक पोलीस निरिक्षक इम्रान नायकवडे, अंमलदार विनय गुप्ता, अजय मिश्रा. चेतन कराडे, विनोद इंगळे यांनी पुर्तता केली. त्यावर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी २४ ऑक्टोबर रोजी आदेश पारीत केले. ठाणेदार करे यांनी ते आदेश तामिल करून त्याला स्थानबध्दतेच्या कालावधीकरीता मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.

काय आहे एमपीडीएमहाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती