शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' प्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 13:12 IST

खा. राणा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून ठाणेदार ठाकरे यांच्याशी मोठा वाद देखील घातला होता.

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध स्थानिक राजापेठ पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्ह्याची नोंद केली. याबाबत येथील एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भादंविचे कलम ५०० (बदनामी) व ५०६ (धाकदपटशा) नुसार खा. राणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार मनीष ठाकरे यांनी त्याला दुजोरा दिला.

येथील एका मुलीचे विशिष्ट धर्मीय मुलाने अपहरण केले असून, त्याला कडकपणे विचारा, त्यातून सर्व उलगडेल, ते अपहरण नसून लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप खा. राणा यांनी ७ सप्टेंबर रोजी केला होता. त्यावरून खा. राणा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून ठाणेदार ठाकरे यांच्याशी मोठा वाद देखील घातला होता. तर दुसरीकडे ती मुलगी त्याच दिवशी सातारा येथे सुखरूप मिळाली होती. त्यापूर्वी, राजापेठ पोलिसांनी त्या मुलीच्या अपहरण प्रकरणी एका विशिष्ट धर्मीय मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच मुलाने त्या मुलीला लव्ह जिहादसाठी पळवून लावल्याचा आरोप लावण्यात आला.

खासदार राणा यांनी देखील त्या मुलाची अधिक चौकशी करण्याची आग्रही मागणी पोलिसांकडे केली होती. प्रत्यक्षात मात्र आपले कुणीही अपहरण केले नाही. आपण स्वत:हून रागाच्या भरात एकटेच घराबाहेर पडलो, अशी स्पष्टोक्ती तिने दिली. तथा आपली बदनामी थांबवावी, असे आवाहन खासदार राणा यांना केले होते.

काय आहे तक्रारीत?

याबाबत त्या विशिष्ट धर्मीय मुलाच्या वडिलांनी शनिवारी खा. नवनीत राणा यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. खा.राणा यांच्या निवेदनामुळे माझ्या मुलाची तथा कुटुंबाची नाहक बदनामी झाली, तथा त्याला पाहून घेण्याची धमकी देखील देण्यात आली. त्यामुळे तो घराबाहेर पडण्याची हिंमत गमावून बसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्या मुलीचा आपल्या मुलाशी दुरान्वये संबंध नसताना खा. राणा यांनी त्याला कडकपणे विचारा, त्याच्याशी नरमाईने वागू नका, अशी सूचना राणा यांनी पोलिसांना केल्याने आपला मुलगा प्रचंड दबावात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravatiअमरावतीLove Jihadलव्ह जिहाद