शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ओवाळणीपूर्वीच भावावर काळाने घातली झडप; जीपच्या धडकेत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 11:32 IST

दोघे जखमी

पथ्रोट (अमरावती) : अंजनगाव सुर्जी ते परतवाडा मार्गावरील जवळापूर फाट्यानजीक बुधवारी रात्री ८ वाजता दुचाकी व विनाक्रमांकाच्या जीपमध्ये झालेल्या धडकेत दुचाकी चालक ठार झाला, तर दोघे जखमी झाले. तिघेही पथ्रोट येथील रहिवासी आहेत.

भाऊबीजेनिमित्त दोघे मावसभाऊ मित्रासह पथ्रोट येथून अंजनगावला कपडे घेण्याकरिता दुचाकीने जात होते, तर विना क्रमांकाची जीप अंजनगावकडून परतवाडाकडे येत होती. या जीपला दुचाकीने जबर धडक दिली. यात कुलदीप आसोले व आयुष बोरकर हे गंभीर जखमी झाले, तर सूरज चिठोरे किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच, पथ्रोट पोलिसांसह नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना तत्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान कुलदीपचा मृत्यू झाला. गंभीर जखमी आयुषवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात गुरुवारी कुलदीपवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईचा एकुलता एक कुलदीप अखेर विझला.

जीप अमरावती येथील व्यक्तीची असून सातेगाव येथील चालक होता. त्यातील महिला व मुलीही जखमी झाल्या. चालक पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ओवाळणीचे स्वप्न भंगले

भाऊबीजेनिमित्त अकोला येथून आलेली मावसबहीण कुलदीपला ओवाळणी घालणार होती. त्याचा एक भाग म्हणून तो अंजनगावला निघाला होता. लवकर येतो, असे त्याने सर्वांना सांगितले. मात्र, त्याचे कलेवरच घरी आले.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती