शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

१०० दिवसांत ९६१ संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १०० दिवसांत ९६१ व तीन दिवसांत १६६ संक्रमितांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली. सोमवारी ४७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९६१ झाली, तर चौघे दगावल्याने मृतांची संख्या ३४ झाली.

ठळक मुद्दे७२ तासांत १६६ : सोमवारी ४७ पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनच्या शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १०० दिवसांत ९६१ व तीन दिवसांत १६६ संक्रमितांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली. सोमवारी ४७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९६१ झाली, तर चौघे दगावल्याने मृतांची संख्या ३४ झाली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षक प्रयोगशाळाद्वारे प्राप्त अहवालानुसार, अतुलनगरातील २६ वर्षीय, एलआयसी कॉलनीतील ४९ वर्षीय, अंजनगाव सुर्जीतील ६५ वर्षीय, संजय गांधीनगरातील २१ वर्षीय, राजुरा बाजार येथील २६ वर्षीय व ४८ वर्षीय, भारतनगरातील ४३ वर्षीय, शेगाव नाका येथील ३० वर्षीय, मांगीलाल प्लॉट येथील १९ वर्षीय, बिच्छुटेकडी येथे ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. श्रीरामनगरातील २७ वर्षीय, वलगाव येथील ५३ वर्षीय, गाडगेनगर, सुकळी, हनुमाननगरातील प्रत्येकी २५ वर्षीय, शेगाव नाका येथील ६८ वर्षीय, प्रियंका कॉलनीतील ४५ वर्षीय, छत्रसाल नगरातील १६ वर्षीय, गुरुकृपा कॉलनीतील ४९ वर्षीय, दर्यापूर येथील ४५ वर्षीय, सिद्धार्थनगरातील ४६ वर्षीय, वाकी रायपूर येथील ३० वर्षीय, वल्लभनगरातील २० वर्षीय, वडाळीतील ३०, अंबा कॉलनीततील ५५ वर्षीय, सराफा लाईन येथील ३० वर्षीय, अचलपुरातील ५० वर्षीय, मोर्शी व यशोदानगरातील ४० वर्षीय, माधवनगरातील ४४ वर्षीय, बिच्छुटेकडी येथील ४९ वर्षीय व चांदूर रेल्वे येथील ५८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सायंकाळच्या अहवालात अंजनगाव सुर्जी येथील ५० वर्षीय, श्रीकृष्ण पेठ येथील ३३ वर्षीय, श्रीकृष्ण पेठेतील २३ वर्षीय, पंजाबराव कॉलनीतील २० व ५३ वर्षीय, शेगाव नाका येथील ६२ वर्षीय, राहुलनगरात ४९, ५४ व ५९ वर्षीय, बिच्छुटेकडी येथील ३२ वर्षीय पुरुष व श्रीकृष्ण पेठेतील २५ वर्षीय, नंदनवन कॉलनीतील ४५ वर्षीय व्यक्ती, अप्पर वर्धा कॉलनीतील १३ वर्षीय बालिका व १८ वर्षीय तरुणी व अशोकनगरातील ५२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.मृतांची संख्या ३४साबणपुरा येथील ५८ वर्षीय पॉझिटिव्ह व्यक्तीचा १९ जूनला व चपराशीपुऱ्यातील ८ जुलै रोजी पॉझिटिव्ह आलेल्या ७० वर्षीय व्यक्तीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. प्रवीणनगरातील ५५ वर्षीय महिला व चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव येथील ५२ वर्षीय व्यक्तींचे सारीने निधन झाले. मात्र, त्यांचा सोमवारी पॉझिटिव्ह अहवाल आल्याने मृतांची संख्या ३४ झालेली आहे.आणखी एका खासगी रुग्णालयास परवानगी४० बेडच्या आणखी एका खासगी रुग्णालयास कोविड-१९ चे उपचार करण्यास शासनाने परवानगी दिली. डॉ. ढोले हॉस्पिटल, वलगाव येथील केंद्र व पीडीएमसी येथेही व्यवस्था केली जाईल. स्थिती बिकट झाल्यास सुपर स्पेशालिटीमध्ये फक्त क्रिटिकल रुग्णांवरच उपचार केले जातील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या