शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांची ९१ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 00:11 IST

जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या ९१ सदस्य पदे रिक्त आहेत.

आयोगाने मागितली माहिती : जात वैधतेअभावी ७३ सदस्यत्व रद्दअमरावती : जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या ९१ सदस्य पदे रिक्त आहेत. याविषयीची माहिती राज्य निवडणूक आयोगाला मागितली आहे. डिसेंबर पूर्वी या पदांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राखीव प्रभाग निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडावे लागतात. हे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावे लागतात. अन्यथा उमेदवार विजयी झाल असला तरी मुदतीच्या आत प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ६ वर्षासाठी अपात्र राहण्याची वेळ येते.जातवैधता प्रमाणपत्राची महत्त्वाची अट असल्याने अनुसूचित जमाती व भटक्या जमातीचे उमेदवार बहुतांश ग्रामपंचायती निवडणुकीस उपलब्ध होत नसल्याने येथील पद रिक्त राहिलेत. सलग तीन वेळा राखीव प्रभागातील पद रिक्त राहिल्यास चवथ्यांदा या पदाचे आरक्षण बदलविण्यात आले आहे. त्यामुळे यानंतर घेणाऱ्या ग्रामपंचातीच्या रिक्त पदांच्या निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या पदांचे आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत कुंड (सर्जापूर), बोरगाव (धर्माळे), बैलमारखेडा, रामा, हातखेडा, सार्सी, पाथरगाव, कळमजापूर, हिंगणगाव, पिंपळगाव निपाणी, सिध्दनाथपूर, जामगाव, जनुना, खिरसाना, नांदसावंगी, भगुरा, निमदरी, बेलखेडा, पिंपळखुटा, देवमाळी, रामापूर, बेलोरा, गोविंदपूर, खरपी, वाल्होडी, मोसाद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, पणोरा, सामदा, घोडचंदी, घडा, लखाड, कोकर्डा, मायवाडी, गोराळा, बेलोना, शिरूर, भाईपूर, वाघोली, गणेशपूर, बिरोटी, सावलीपूर, नांदुरी, खाऱ्याटेंभू, चटबाबोड, कुटंगा, सुसर्दा, कारादा, दादरा, हिराबंबई, हरिसाल, काकादरी, सोनापूर, टेंब्रुसोडा, रुईपठार, रायपूर, माखली, खिरपाणी, सोमढाणा, अढाव, आमझरी, जामलीवन, डोमा व बारलिंगा, ग्रामपंचायतची पदे विविध कारणांनी रिक्त आहेत. डिसेंबरपूर्वी या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने गावखेड्यांमधील राजकारणाला वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी जात वैधता प्रमाणपत्रांसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव युद्धस्तरावर सुरू आहे.या ठिकाणी आरक्षण बदलाची शक्यताजिल्ह्यात यापूर्वी २२ एप्रिल,२५ जुलै, १ नोव्हेंबर २०१५ व १७ एप्रिल २०१६ रोजी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व रिक्त सदस्य पदांच्या निवडणूक झाल्यास मात्र ज्या राखीव प्रभागात उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही तेथे आता आरक्षण बदलाची शक्यता आहे. कुंड (सर्जापूर) बोरगाव (धर्माळे) व सोमठाणा खुर्द या ग्रामपंचायतीमधील राखीव प्रभागांचा समावेश आहे.