शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

अप्परवर्धा धरणात 90.53 टक्के जलसाठा, स्थानिकांची पाण्याची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 2:57 PM

विदर्भात सर्वाधिक जल संचय क्षमता असलेल्या अप्पर वर्धा धरणात ९०.५३ टक्के जलसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापन सूत्रांकडून मिळाली आहे.

अमरावती, दि. 21 - विदर्भात सर्वाधिक जल संचय क्षमता असलेल्या अप्पर वर्धा धरणात ९०.५३ टक्के जलसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापन सूत्रांकडून मिळाली आहे. मंगळवार, बुधवारी मध्य प्रदेशसह धरण क्षेत्रातील परिसरात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक गतीने झाली. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक पाणीसाठा अप्परवर्धा धरणात झाला आहे. यावर्षी विदर्भात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले अद्यापही कोरडेच आहेत. त्यामुळे यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळणार नाही, या विवंचनेत शेतकरी होते; तथापि उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्यासाठी पाणीटंचाई भासेल, या उद्देशाने जीवन प्राधिकरण विभाग, महापालिका प्रशासनाने बैठक घेऊन पाणी कपातीचा आढावा घेतला होता. 

त्याअनुषंगाने १५ दिवसांपूर्वीच नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली होती. मात्र आता आवश्यकतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने नागरिकांसह शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. धरणात पाण्याची अधिक आवक पाहता गेट उघडण्याचा मानस धरण व्यवस्थापनाने केला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे.

राज्यातील २४ धरणे ओव्हर फ्लो

दरम्यान, राज्यात दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने, ३७ पैकी २४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातून आता पाणी सोडणे सुरू झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणांतून पाणी सोडले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यातील जलसाठा कमाल पातळीला पोहोचल्यानंतर धरणांचे दरवाजे उघडावे लागतील, असे जलसंपदामंत्रीगिरीश महाजन यांनी सांगितले. बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून निरा देवघर सांडव्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, ३,६४० व पावरहाउसमधून ७५० असे एकूण ४,३९० क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. वडीवळेमधून १३७, भाटघरमधून २,१६७ आणि मुळशीमधून ७००० क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याचे ते म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. खरिपाच्या पेरण्या शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या आहेत. २० सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. इगतपुरी, त्र्यंबकला अतिवृष्टीची नोंद झाली. मालेगाव, नांदगाव, कळवण, बागलाण, देवळा हे तालुके कोरडेच आहेत.

तर जायकवाडीचे दरवाजे उघडणारजायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. वरच्यासर्व धरणांतून मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे, धरणात १,९२५.३० दलघमी पाणीसाठा (क्षमता २,१७१ दलघमी) झाला आहे. ते २,१७१ च्या वर गेल्यास दरवाजे उघडावे लागतील. कोयना धरणाने २८०४.८६ दलघमीची पातळी (क्षमता २,८२६ दलघमी) ओलांडल्याने सहा दरवाजे उघडण्यात आल्याचे महाजन म्हणाले. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी विदर्भात जोरदार, कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात ‘पाणी’बाणी३३.३८ टक्के पाणीसाठा अमरावती विभागामधील धरणांत जमा आहे. तर ३५.६९ टक्के पाणीसाठा नागपूर विभागामधील धरणांत जमा आहे.