शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बिस्मिल्लानगरातील ९५ अवैध नळजोडण्या तोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:52 IST

शहरातील बिस्मिल्लानगर, लालखडी आदी भागातील ९५ अवैध नळ जोडण्या बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पथकाने खंडित केल्या. ३१ जुलैपासून ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. 

ठळक मुद्देमजीप्राची धडक कारवाई : ३१ जुलैपासून मोहीम सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील बिस्मिल्लानगर, लालखडी आदी भागातील ९५ अवैध नळ जोडण्या बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पथकाने खंडित केल्या. ३१ जुलैपासून ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. मजीप्राच्या टाकीतून महाजनपुरा, ताजनगर, अलीमनगर, कमेला ग्राऊंड, छायानगर, जाकीर कॉलनी, गुलिस्ता नगर, यास्मिननगर, बिस्मिल्लानगर, लालखेडी, नूरनगर, हबीबनगर, अन्सारनगर आदी भागांतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या परिसरातील काही जण अवैध नळजोडणी घेऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे निदर्शनात आले. साधारणपणे ६० टक्के नागरिकांकडून मोटरपंप लावून पाणी खेचण्याचा प्रकार केला जात असल्याने इतरांना योग्य दाबाने पाणीपुरवठा करणे मजीप्रासाठी कठीण बाब झाली आहे. पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने मजीप्राला वैध जोडणीधारकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील अवैध नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम ३१ जुलैपासून हाती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान बिस्मिल्लानगरात ९५ जोडण्या खंडित करण्यात आल्या. कारवाईत अडथळा आणणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता वसंत मस्करे यांनी दिली.अपुऱ्या मनुष्यबळामुळे कसरतअपुरे मनुष्यबळ, नळजोडणी असणारे बहुतांश रस्ते काँक्रीटचे असणे, अवैध नळजोडणी असणाऱ्या नागरिकांची कर्मचाºयांप्रति आक्रमक वृत्ती या सर्व प्रकारांमध्ये मजीप्राला अवैध नळजोडण्या तोडताना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील नागरिक व नगरसेवकांच्या सहकार्याशिवाय पाणीपुरवठ्यामध्ये सातत्य व समतोल राखणे अशक्य आहे. नागरिकांमध्येदेखील स्वंयशिस्त महत्त्वाची आहे.सहा हजारांवर अवैध जोडण्यालालखडी परिसरात किमान सहा हजार अवैध नळजोडण्या असल्याचा मजीप्राचा अंदाज आहे. मागील वर्षी याविषयीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता ३१ जुलैपासून धडक मोहीम हाती घेण्यात आली व एका दिवसात ९० अवैध नळजोडण्या खंडित केल्या. सामाजिक संघटनांनी या कामी सहकार्य करून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे आवाहन मजीप्राने केले आहे.मंगळवारपासून अवैध नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम मजीप्राने हाती घेतली. एका दिवसात ९५ नळजोडण्या खंडित केल्या आहेत. ही मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे.- संजय लेवरकर सहायक अभियंता, मजीप्रा