शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाधित कपाशीच्या भरपाईसाठी हवेत ९०० कोटी! बुलडाणा जिल्ह्यामुळे विभागाचा प्रस्ताव रखडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 16:05 IST

यंदाच्या खरिपात विभागातील १० लाख ७१ हजार हेक्टर कपाशी क्षेत्रापैकी किमान ९ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी किमान ९०० कोटींची मदत ‘एनडीआरएफ’मधून अपेक्षित आहे.

- गजानन मोहोड अमरावती - यंदाच्या खरिपात विभागातील १० लाख ७१ हजार हेक्टर कपाशी क्षेत्रापैकी किमान ९ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी किमान ९०० कोटींची मदत ‘एनडीआरएफ’मधून अपेक्षित आहे. विभागातील चार जिल्ह्यांचे संयुक्त अहवाल प्राप्त असताना बुलडाणा जिल्ह्याचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. त्यामुळे शासनाला मदतीची मागणी करावयाचा विभागाचा प्रस्ताव रखडला आहे.  अमरावती विभागात यंदाच्या खरिपात ८ लाख ६० हजार शेतकºयांनी १० लाख ७१ हजार १९  हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिण्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने एकूण क्षेत्राच्या तुलनेत ९० टक्के म्हणजेच ९ लाख  हेक्टर क्षेत्रात कपाशीचे ३३ टक्कयांवर नुकसान झाले आहे. प्राप्त चार जिल्ह्यांतील संयुक्त अहवालानुसार यामध्ये जिरायती कपाशीचे ७ लाख २६ हजार ७७ हेक्टर तर बागायती कपाशीचे एक लाख ३४ हजार ३५८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायतीन क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रूपये या प्रमाणे ५०१ कोटी ८२ लाख २९ हजार तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रूपये प्रति हेक्टरप्रमाणे १८० कोटी ८७ लाख १४ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे. बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी  गुलाबी बोंडअळीने बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश ७ डिसेंबरला विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी पाचही जिल्ह्यधिकाºयांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कपाशी पीकबाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व तुडतुड्यांमुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी दिले होते. या अनुषंगाने पाचही जिल्हाधिकाºयांनी संबंधित तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकाºयांना संयुक्त अहवाल मागविला होता. सद्यस्थितीत बुलडाणा वगळता सर्व जिल्ह्यांचे संयुक्त अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त आहेत.

 विभागातील कपाशीचे नुकसान, आवश्यक मदत- अमरावती जिल्ह्यात २,२०,२६५ शेतकºयांच्या १,९९,१७३ हेक्टरमधील कपाशीचे  नुकसान झाले. यासाठी १८२.६० कोटींची मदत अपेक्षित आहे.- अकोला जिल्ह्यात १,३३,६६८ शेतकºयांच्या १,४३,४८१ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले, यासाठी १३५.५१ कोटींची मदत अपेक्षित आहे.-  यवतमाळ जिल्ह्यात ३,५८,४८५ शेतकºयांच्या ४,९४,५७५ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले, यासाठी ३४९.१७ कोटींची भरपाई अपेक्षित आहे.-  वाशिम जिल्ह्यात २२,५११ शेतकºयांच्या २३,२०७ हेक्टरमधील कपाशी बोंडअळीने बाधित झाल्याने १५.४० कोटींची मदत आवश्यक आहे.