शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

८६५ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना ठरणार 'माईलस्टोन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:07 IST

अजित पवार : पाणीबाणीवर मात, १४२० कोटींतून विकासकामे प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अमृत-२ वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत राज्य शासनाने ८६५.२६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तपोवन परिसर येथे या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. अमरावतीकरांकडे धरण होते; परंतु पाणी पोहोचवणारी पाइपलाइन जुनी झाल्याने ते शहराला पाणी पोहोचविताना अडचणी येतात; या निधीमुळे आता अमरावतीकरांचा २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार असल्याचे ना. पवार म्हणाले. 

शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी १४२० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा नियोजनच्या सभागृहात गुरुवारी विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे उपस्थित होते.

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीची मागील सात वर्षांपासून जिल्ह्याला प्रतीक्षा होती. आता ही इमारत काही दिवसातच रुग्णांच्या सेवेत कार्यान्वित होणार असल्याने जुन्या इमारतीमध्ये होणारे गर्भवती व नवजातांचे हाल थांबतील. 

सारथी'ला ५०० आसन क्षमतेचे श्रोतृगृहशासनाला उत्पन्न देणाऱ्या विभागांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करण्यात येत आहे. त्या विभागांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. विकासकामे करताना पुढील काळाचा विचार ठेवण्यात आला आहे. 'सारथी' संस्थेमध्ये ३०० आसन क्षमतेचे श्रोतागृह मंजूर आहे; मात्र आता राज्यातील सर्व 'सारथी'च्या ठिकाणी ५०० क्षमतेचे श्रोतृगृह राहणार आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधीही देण्यात येणार आहे. 

विभागीय स्तरावर क्रीडा सुविधा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, बारावीनंतर विद्यावेतन, शेतकऱ्यांना मोफत वीज, दुधाला अनुदान, तीन गॅस सिलिंडर तसेच 'सारथी', 'बार्टी'सारख्या संस्था उभारून अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. विभागीय स्तरावर चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांकडून विविध कामांचे उद्घाटन पाणीपुरवठ्याची अमृत योजना, 'सारथी'चे विभागीय कार्यालय, लालखडी रेल्वे उड्डाणपूल, चांगापूर फाटा रस्ता, विभागीय क्रीडा मैदानाचे भूमिपूजन तसेच जिल्हा स्त्री र रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वस्तू व सेवा कर इमारतीचे • नूतनीकरण, विदर्भ ज्ञान- विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा, वडाळी उद्यान सौंदर्याकरण, उत्पादन शुल्क विभागाची इमारत तसेच नगरोत्थान अभियानातील कामांचे ऑनलाइन भूमिपूजनदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारwater transportजलवाहतूकAmravatiअमरावती