शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

८२ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

By admin | Updated: September 29, 2016 00:23 IST

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ११९ टक्के झालेला पाऊस व पंधरवड्यापासून सुरू असलेला परतीचा पाऊस ..

दिलासा : सरासरी ९६ टक्के जलसाठा अमरावती : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ११९ टक्के झालेला पाऊस व पंधरवड्यापासून सुरू असलेला परतीचा पाऊस यामुळे जिल्ह्यातील मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ८२ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झालेले आहेत. यासर्व प्रकल्पांत सरासरी ९५.१४ जलसाठा आहे. जिल्ह्यातील एकमेव मुख्य प्रकल्प उर्ध्व वर्धा प्रकल्पात संकल्पित ५६४.०५ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत तेवढाच जलसाठा आहे. ही टक्केवारी १०० आहे. जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी शहानूर प्रकल्पात संकल्पित ४६.०४ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ४३.१२ दलघमी जलसाठा आहे. ही ९३.६६ टक्केवारी आहे.चंद्रभागा प्रकल्पात संकल्पित ४१.२५ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत ४०.६१ दलघमी जलसाठा आहे. ही ९८.४५ टक्केवारी आहे. पूर्णा प्रकल्पात संकल्पित ३५.३७ दलघमी पाण्याच्या तुलनेत ३३.३६ दलघमी जलसाठा आहे. ही ९४.३२ टक्केवारी आहे. प्रकल्पात संकल्पित ३८.६० दलघमी साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ३६.८७ दलघमी जलसाठा आहे. ही ९५.५२ टक्केवारी आहे. जिल्ह्यात एकूण ७७ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांची सरासरी संकल्पित पातळी १७९.८४ दलघमी साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत १४३.१७ दलघमी जलसाठा आहे. ही ९५.४७ टक्केवारी आहे. यासर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने परतीचा पाऊस होत असल्याने प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झालेले आहेत. धरण प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून धरणातून अल्पसा विसर्ग सुरू केला आहे. (प्रतिनिधी)तीन धरणांचे दरवाजे उघडलेधरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून परतीचा पाऊस होत असल्याने थोड्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामध्ये उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे ५ गेट १५ से.मी. ने उघडण्यात येऊन १२३ घमीप्रसे विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा प्रकल्पाचे २ गेट ५ सेमीने उघडण्यात येऊन १२ घमीप्रसे विसर्ग सुरू आहे. पूर्णा प्रकल्पाची २ गेट ५ से.मी. ने उघडण्यात येऊन ८.९२ घमीप्रसे विसर्ग सुरू आहे. सरासरीत चिखलदरा शेवटच्या स्थानी जिल्ह्यात १ जून ते २६ सप्टेंबर या कालावधीत ७९१.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९२६.७ मिमी पाऊस पडला. ही ११८.९ टक्केवारी आहे तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ११५.५ मिमी हा पाऊस सर्वाधिक १६३ टक्के पाऊस चांदूरबाजार तालुक्यात पडला तर सर्वात कमी ९६.१ टक्के चिखलदरा तालुक्यात पडला.