शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यांतील ८ हजार ८७ पाणी नमुने रसायनयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 18:30 IST

: रासायनिक, अनुजीव तपासणीचा अहवाल - वैभव बाबरेकर अमरावती : विभागाच्या पाच जिल्ह्यांतील पाणी तपासणीच्या अहवालात यवतमाळ जिल्ह्याचे पाणीनमुने सर्वाधिक दूषित आढळून आले असून, अमरावती दुसºया क्रमांकावर आहे. यवतमाळातील ६ हजार ७९२ पाणीनमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये तब्बल ४ हजार ३६२ नमुने दूषित आढळले आलेट. अमरावतीमधील ५ हजार ४८८ पाणी ...

: रासायनिक, अनुजीव तपासणीचा अहवाल - वैभव बाबरेकर अमरावती : विभागाच्या पाच जिल्ह्यांतील पाणी तपासणीच्या अहवालात यवतमाळ जिल्ह्याचे पाणीनमुने सर्वाधिक दूषित आढळून आले असून, अमरावती दुसºया क्रमांकावर आहे. यवतमाळातील ६ हजार ७९२ पाणीनमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये तब्बल ४ हजार ३६२ नमुने दूषित आढळले आलेट. अमरावतीमधील ५ हजार ४८८ पाणी नमुन्यांच्या तपासणीत २ हजार ४२५ नमुने दूषित आढळले आहेत.  सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू असून, या कालावधीत दूषित पाणीपुरवठा सर्वाधिक होतो. पाण्यात रासायनिक तत्त्व असल्यास, ते पाणी दूषित असल्याचे स्पष्ट होते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने १ एप्रिल ते ३० जुलै दरम्यान पाच जिल्ह्यांतील पाणीनमुन्यांची रासायनिक तपासणी केली.  त्यात पाचही जिल्ह्यांतून तब्बल १९ हजार २७४ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी तब्बल ८ हजार ८७ नमुने दूषित (अनफिट) आढळून आले. रसायनयुक्त पाणी पिण्यास अयोग्य असून, या रसायनयुक्त पाण्याचे घातक परिणाम मानवी शरीरावर होते. वारंवार हे दूषित पाणी पिण्यात आल्यास किडनी व लिव्हरवर परिणाम होते. सोबत अशा दूषित पाण्यामुळे दात खराब होणे, हाडे ठिसूळ होणे व त्वचारोग होण्याची दाट शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. अशा दूषित पाण्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांत विविध आजारांचे रुग्ण वाढले असून, शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांचा ओघ सुरू असल्याचे आढळून आले आहे. दूषित पाण्यावर उपाययोजनेसाठी प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र पाचही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 

पाणी नमुन्यात तपासली जातात ही रसायने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे प्राप्त झालेल्या पाणीनमुन्यात नायट्रेट, टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह्ड सॉलिड), क्लोराइड, फ्लोराइड, टोटल हार्डनेस, अल्कनिटी, पीएच, आर्यन, सल्फेटचे अवशेष आहेत का, हे तपासले जाते. यापैकी कोणतेही रसायन आढळल्यास ते पाणी दूषित (अनफिट) ठरविले जाते. वर नमूद केलेल्या दूषित पाण्यात यापैकी काही रसायने आढळून आली आहे. त्यामध्ये पाण्यात नायट्रेटचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती जीएसडीने दिली आहे. 

दूषित पाण्यात यवतमाळ अव्वलविभागातील पाच जिल्ह्यांतील १९ हजार २७४ पाणी नमुन्यांपैकी ८ हजार ८७ नमुने दूषित आढळले. त्यामध्ये अमरावतीमधील ५ हजार ४८८ पाणीनमुन्यांच्या तपासणीत २ हजार ४२५ दूषित आहेत. त्याच प्रमाणे अकोला येथील १ हजार ८७८ नमुन्यांपैकी तब्बल १ हजार २८ नमुने दूषित, यवतमाळातील ६ हजार ७९२ पैकी २ हजार ४४०, वाशिम येथील ८४८ पैकी २१५, तर बुलडाणा येथील ४ हजार २६८ पैकी १ हजार ९८९ नमुने दूषित आढळले. 

रसायनयुक्त पाणी किडनी व लिव्हरवर परिणाम करते. मध्यंतरी यवतमाळात किडनीचे रुग्ण वाढले होते. अशा दूषित पाण्यामुळे किडनी स्टोन हे एक कारण असू शकते. अशा रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन रुग्णालय.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती