शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

१०० दिवसांत ७३ आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:56 IST

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र अटी-शर्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत ७३ शेतकºयांनी मृत्यूचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर ...

ठळक मुद्देधक्कादायक वास्तव : दर १८ तासांत शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूलाशेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र केव्हा?

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र अटी-शर्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत ७३ शेतकºयांनी मृत्यूचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर १८ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगाव कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात १० एप्रिल २०१८ पर्यंत ३ हजार ३९८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ४०७ प्रकरणे पात्र, १ हजार ९३४ अपात्र, तर ५७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैवी आहे. २००१ मध्ये ११ प्रकरणे होती. २०१६ मध्ये ३४९, तर गतवर्षी २७४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यंदा जानेवारी महिन्यात २३, फेब्रुवारी २०, मार्च २६ व एप्रिलच्या १० दिवसांत चार शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज आहे.गेल्या १७ वर्षांचा आढावा घेता सर्वाधिक ३२३ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या आहेत. जानेवारी महिन्यात २६७, फेब्रुवारी २९०, मार्च २७९, एप्रिल ३०५, मे २८६, जून २५७, जुलै २६२, सप्टेंबर ३१५, आॅक्टोबर २८४, नोव्हेंबर २७९ व डिसेंबर महिन्यात २७९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे शासन नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामातील पेरणीपश्चात दरवर्षी शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे वास्तव आहे.शेतकरी स्वावलंबन मिशन कुचकामीराज्यातील शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांसाठी आघाडी सरकारने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. या मिशनला गती यावी, यासाठी २४ आॅगस्ट २०१५ रोजी राज्य शासनाने या मिशनची पुनर्रचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास या मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे.बळीराजा चेतना अभियान केव्हा?राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. निराशेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात याचे पथदर्शी स्वरूपात अभियान राबविण्यात येत असताना सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.