शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

७३, ७४ व्या घटना दुरुस्तीचा रौप्य महोत्सव, २० जानेवारीला अमरावती विद्यापीठात आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 17:52 IST

पंचायत राज व्यवस्थेत ७३ व्या घटना दुरुस्तीने आमूलाग्र सुधारणा झाल्या. त्याचप्रमाणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ७४ व्या घटना दुरुस्तीने मोठे बळ दिले. त्याला २५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक व प्रशासन यासंदर्भात विभागीय स्तरावरील परिषद २० जानेवारीला संत गाडगेबाबा विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. 

अमरावती  - पंचायत राज व्यवस्थेत ७३ व्या घटना दुरुस्तीने आमूलाग्र सुधारणा झाल्या. त्याचप्रमाणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ७४ व्या घटना दुरुस्तीने मोठे बळ दिले. त्याला २५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक व प्रशासन यासंदर्भात विभागीय स्तरावरील परिषद २० जानेवारीला संत गाडगेबाबा विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उदघाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या पदाधिकाºयांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे. या परिषदेला अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाºयांना निमंत्रित केले आहे. देशाच्या विकासात पंचायत राज संस्थांचे महत्त्व ओळखून माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या दूरदृष्टीतून ७३ वी घटनादुरुस्ती झाली. त्यांच्यामुळेच पंचायत राज व्यवस्थेला स्वायत्त संस्था म्हणून स्थान मिळाले. त्यासाठी ६४ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत मांडले गेले. आॅगस्ट १९८९ मध्ये त्याला लोकसभेत मान्यता मिळाली; परंतु राज्यसभेत बहुमत नसल्याने हे विधेयक रखडले होते. सप्टेंबर १९९० मध्ये पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे विधेयक पुन्हा मांडण्यात आले. मात्र, त्यावर चर्चा होण्यापूर्वीच लोकसभा बरखास्त झाली.काँग्रेसचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने पुन्हा सप्टेंबर १९९१ मध्ये हे विधयक तिसºयांदा मांडले व २२ डिसेंबर १९९२ रोजी लोकसभेने, तर २३ डिसेंबर १९९२ ला राज्यसभेने मंजुरी दिली. या दुरुस्तीला २० एप्रिल १९९३ रोजी मान्यता दिल्यानंतर २४ एप्रिल १९९३ पासून या दुरुस्तीची अंमलबजावणी देशात सुरू झाली. त्यामुळे ग्रामपंचायतींना मोठी स्वायत्ता मिळाली. ब्रिटिश कालखंडामध्ये नागरी स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा, ही मागणी पुढे आली होती. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात पंतप्रधान राजीव गांधींनीच १९८९ मध्ये नगरपालिकेसंबंधी ६५ वे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले होते. यानंतर पंतप्रधान व्ही.पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केलेत. मात्र, १९९१ ला पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळातच या विधेयकाला मंजुरी मिळाली आणि ३१ मे १९९४ पासून या शिफारशी लागू झाल्या. एकूणच ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीमुळे ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठे बळ मिळाले. त्या दृष्टीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विभागीय परिषद २० जानेवारीला सकाळी १० वाजता डॉ. के.जी. देशमुख सभागृहात आयोजित केली आहे. यासाठी पदाधिका-यांना निमंत्रित केले आहे. त्यांच्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ