शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

जिल्ह्यातील ७० टक्के गावांत राजकारण पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 6:00 AM

जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य निवडले जाणार आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक विभाग लागला कामाला : ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ५३१९ जागांसाठी घमासान, ५० टक्के महिला राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य निवडणूक आयोगाद्वारे ५२६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ७० टक्के गावांमध्ये राजकारण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर सरपंचपदाचे आरक्षणाची तारीख जाहीर झालेली नसल्याने निवडणूक विभागासह इच्छुकांची प्रतीक्षा ताणली आहे.जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य निवडले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात एक हजार सदस्य, अनुसूचित जमाती प्रवर्गात १२०१, नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये ११७० व सर्वसाधारण प्रवर्गात १९४८ सदस्य निवडले जातील. यामध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये १४ लाख ४३ हजार ६८३ लोकसंख्या आहे. यामध्ये २ लाख ४८ हजार ९८३ अनुसूचित जाती व ३ लाख ३७ हजार ७९१ लोकसंख्या ही अनुसूचित जमाती प्रवर्गाची आहे. जिल्हा निवडणूक विभागाद्वारे ही सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाला व ग्रामविकास विभागाला ५ फेब्रुवारीला पाठविण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही सरपंचपदाचे आरक्षण काढण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नसल्याने गावागावांत प्रतीक्षा होत आहे.सरपंचपदाचे निवडीबाबत चर्चेला उधाणआयोगाने शासन अधिसुचना १३ आॅगस्ट २०१८ चा संदर्भ देऊन थेट जनतेमधून सरपंच निवडल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मंगळवारी विधानसभेत ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडीचा प्रस्ताव पारीत केला असल्याने पुन्हा सदस्यांमधून सरपंच निवडले जाणार असल्याचे मेसेज दिवसभर व्हायरल झाल्याने संभ्रम होता. यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागासी संपर्क साधला असता, याविषयी कुठलेच आदेश नसल्याचे सांगण्यात आले.शिवरात शेतकरी व्यस्तगावागावातील निवडणुकीचा कार्यक्रम दीड महिना राहणार आहे. मात्र, याच काळात शिवारांमध्ये हरभऱ्याची सवंगणी व मळणीचा हंगाम राहणार असल्याने शेतकरी व्यस्त राहणार आहे. संपर्क साधताना उमेदवारांची कसरत होणार आहे.

टॅग्स :sarpanchसरपंच