शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रियेअभावी शेतकऱ्यांचे ६९ कोटी शासनाकडे पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:03 IST

Amravati : शेतकऱ्यांशी संपर्क करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : आपत्तीच्या काळात शासनाद्वारे बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. यामध्ये सन २०२२ पासून १२ वेळा शासनाने मदतनिधी उपलब्ध केला आहे. परंतु, ८५ हजार शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक (व्हीके) प्राप्त असतानाही त्यांनी ई केवायसी केलेली नाही. त्यामुळे ६९ कोटींचा निधी शासनाकडे पडून आहे. या शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांना शासन निधीचा लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

ई-केवायसी झाल्यानंतरच नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रलंबित ई-केवायसीचे काम मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले आहेत.

अतिवृष्टी, गारपीट, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. भरपाईची रक्कम डीबीटीद्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. अनेक शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी नसल्याने सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे महसूल व कृषी यंत्रणेद्वारे संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क करून प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

या कारणांमुळे ई- केवायसी प्रलंबितअमरावती विभागात २४,४२,२८४ शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली असून, ७४,८०८ शेतकऱ्यांची ई-केवायसी विविध कारणांमुळे प्रलंबित आहे. बोटांचे ठसे न उमटणे, मृत शेतकरी, ठिकाण बदलून गेलेले शेतकरी, आदी तांत्रिक कारणांमुळे ई-केवायसी होणे बाकी आहे, अशा शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

प्रक्रियेअभावी प्रलंबित शासन निधीजून व जुलै २०२२ मधील पावसाचे नुकसान १०.६६ कोटी, ३१ मार्च २०२३ मधील अवकाळीचे ४.८५ लाख, ७ एप्रिल २०२३ रोजी अवकाळी १२.७० लाख, ८ ते ३० एप्रिल २०२३ अवकाळीचे १.०६ कोटी, में २०२३ अवकाळीचे ८९ लाख, सप्टेंबर २०२२ अतिवृष्टीचे ७० लाख, मार्च २०२३ अवकाळीचे ३० लाख, सप्टेंबर २०२३ अतिवृष्टीचे ३.२४ कोटी, जून व जुलै २०२२ अतिवृष्टीचे १.५९ कोटी, नोव्हेंबर २०२३ अवकाळीचे ३२.८१ कोटी, जुलै २०२३ अतिवृष्टीचे ६.३४ कोटी, २०२२ फळपीक अनुदानाचे ५.८७ कोटी पडून आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती