शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

६७ टक्के, धक्कादायक निकाल येणार!

By admin | Updated: October 15, 2014 23:12 IST

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील २२ लाख २१ हजार ६२३ मतदारांपैकी ६७.२६ टक्के मतदारांनी बुधवारी मतदानाचा हक्क बजावला. बहुतांश मतदारसंघांत धक्कादायक निकाल येतील, असा अंदाज आहे.

मतदानात वाढ : अमरावती-बडनेऱ्यात गोंधळ, मतदान यंत्र बंद, मुस्लिम भागात खडा पहाराअमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील २२ लाख २१ हजार ६२३ मतदारांपैकी ६७.२६ टक्के मतदारांनी बुधवारी मतदानाचा हक्क बजावला. बहुतांश मतदारसंघांत धक्कादायक निकाल येतील, असा अंदाज आहे.२००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानात ५ टक्यांनी वाढ झाली. एकूण १३५ उमेदवारांचे राजकीय भाग्य मतदान यंत्रात बंद झाले. १९ आक्टोबर रोजी मतमोजणीनंतर लगेच निकाल जाहीर होतील. मतदान प्रक्रियेदरम्यान बडनेरा व अमरावती मतदारसंघात परस्परविरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याच्या घटना घडल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. चांदूरबाजार तालुक्यात सुमारे १० तर मोर्शी मतदारसंघात ४ मतदान यंत्रांत बिघाड झाला होता; तथापि ही बाब वेळीच लक्षात आल्याने मतदान यंत्र बदलवून देण्यात आलेत.अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे रावसाहेब शेखावत व भाजपचे सुनील देशमुख यांच्यात थेट लढत झाली. शिवसेनेचे प्रदीप बाजड यांचाही उल्लेखनीय प्रभाव होता. बडनेरा मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा खोडके, शिवसेनेचे संजय बंड, राष्ट्रवादी समर्थित रवी राणा आणि भाजपचे तुषार भारतीय यांच्यात लढत झाली. धामणगावात भाजपचे अरुण अडसड, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, शिवसेनेचे सिध्देश्वर चव्हाण आणि बसपाचे अभिजित ढेपे यांच्यात सामना रंगला. मेळघाट मतदारसंघात काँग्रेसचे केवलराम काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार पटेल व भाजपचे प्रभुदास भिलावेकर यांच्यात डाव रंगला. अचलपूर मतदारसंघात भाजपचे अशोक बनसोड, प्रहारचे बच्चू कडू, काँग्रेसचे बबलू देशमुख, शिवसेनेच्या सुरेखा ठाकरे व राष्ट्रवादीच्या वसुधा देशमुख यांच्यात लढत झाल्याचे चित्र होते. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता चौधरी, शिवसेनेचे दिनेशनाना वानखडे यांच्यात लढत झाली. मोर्शी मतदारसंघात भाजपचे अनिल बोंडे, काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे, राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, शिवसेनेचे उमेश यावलकर यांच्यात लढतीचे चित्र होते.