अतिवृष्टीचा परिणाम : प्राणीमात्रांना दिलासामोहन राऊत अमरावतीयंदा दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील ६२ सिंचन ओव्हर फ्लो झाले आहेत़ या तलावांतील पाण्याचा लाभ आगामी काळात सिंचन व जनावराची तहान भागविण्यासाठी होणार आहे़जिल्ह्यात जिल्हापरिषद अंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावाची खोली सरासरी अडीच मीटर ते चार मीटर पर्यंत आहे़ गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे केवळ पावसाळ्यात अकरा तलाव १०० टक्के भरले होते, तर १७ तलाव ६० टक्क्यांवर तसेच २० तलावांत ५० टक्के, ८ तलावांत २५ टक्के व ४ तलावांत १० टक्के जलसाठा होता़ या तलावातील जलसाठा नोव्हेंबर महिन्यातच पूर्णत: संपला होता़ त्यानंतर तलाव कोरडे होऊन मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती़ परिणामी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळी आली होती.मागील आठवड्यात जिल्ह्यातील चिखलदरा, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, दर्यापूर या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला़ त्यामुळे या भागातील सिंचनाचे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत़ या भागातील गावातील जनावरे सकाळी चरायला गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा मोठा आधार मिळणार आहे़ विशेषत: जंगलातील वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होणार आहे़धारणी तालुक्यात असलेल्या १९ तलावांच्या पाण्याची पातळी वाढली आहे़, तर दुसऱ्या क्रमांकावर तिवसा तालुक्यात असलेल्या ११ तलावात अधिक जलसाठा निर्माण झाला आहे़ अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील प्रत्येकी पाच तलावातील पाणीसाठा वाढला तर चांदूर बाजार मोर्शी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघुसिंचन तलावात अधिक जलसाठा निर्माण झाला आहे़ वरूड तालुक्यातील सहा लघुसिंचन तलावाची हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यातील ६२ सिंचन तलाव 'ओव्हरफ्लो'
By admin | Updated: July 19, 2016 00:25 IST