शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

शिवशाही बसमध्ये आढळली ६० किलो चांदी, उशिरापर्यंत मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 5:00 AM

पोलीस सूत्रांनुसार, कुरिअर बॉयकडून हे पार्सल नागपूर आगाराच्या शिवशाही बसमधून पुण्यावरून अकोला मार्गे शनिवारी अमरावतीला आणले गेले. त्या दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस बजावली आहे. कोल्हापूरच्या पाच व राजकोट येथील दोन सुवर्णकारांनी हा चांदीचा माल नागपूरच्या छोट्या व्यापाऱ्यांना पाठविला होता. ज्या व्यापाऱ्यांचा हा माल होता, त्यापैकी कोल्हापूरच्या सुवर्णकारासह राधाकृष्ण कुरिअरचा संचालक हे दोघेही रविवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाले.

ठळक मुद्देकोल्हापूर, राजकोटच्या व्यापाऱ्यांनी पाठविले तीन पार्सल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती  : शिवशाही बसमध्ये संशयास्पद तीन पार्सलमध्ये तब्बल ६० किलो चांदी आणि १० ग्रॅम सोन्याचे एक नाणे आढळून आले. येथील सराफा लाईनमध्ये जप्त केलेला माल शनिवारी मध्यरात्रीपर्यंत मोजमाप करण्यात आला. जप्त ऐवज ४१ लाख ५९ हजार रुपयांचा असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी दिली.पोलीस सूत्रांनुसार, कुरिअर बॉयकडून हे पार्सल नागपूर आगाराच्या शिवशाही बसमधून पुण्यावरून अकोला मार्गे शनिवारी अमरावतीला आणले गेले. त्या दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस बजावली आहे. कोल्हापूरच्या पाच व राजकोट येथील दोन सुवर्णकारांनी हा चांदीचा माल नागपूरच्या छोट्या व्यापाऱ्यांना पाठविला होता. ज्या व्यापाऱ्यांचा हा माल होता, त्यापैकी कोल्हापूरच्या सुवर्णकारासह राधाकृष्ण कुरिअरचा संचालक हे दोघेही रविवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी त्या दोघांचेही बयाण नोंदविले. जो व्यापारी रविवारी ठाण्यात दाखल झाला, त्याचा जप्त पार्सलमध्ये सहा ते साडेसहा लाखांचा माल होता. तो माल परत मिळावा म्हणून काही देयकाच्या प्रती त्यांनी ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांना दाखविल्या. परंतु, पोलिसांनी जप्त चांदी त्या व्यापाऱ्याला देण्यास नकार दिला. ज्या दोन कुरिअर बॉयना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना रविवारी सोडण्यात आले. कोल्हापूरच्या व्यापाऱ्यासह कुरिअर सर्व्हिस संचालकांचे बयाण पोलिसांनी नोंदविले.

विक्रेता, खरेदीदारांची कसून चौकशी सोने-चांदीच्या दागिन्यांच्या प्रवासाबाबत संभ्रम कायम आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी सहा विक्रेते व सहा खरेदीदारांची कसून चौकशी केली. दागिन्यांचा मुद्देमाल हा न्यायालयीन परवानगीशिवाय देता येणार नाही, अशी भूमिका ठाणेदार मेश्राम यांनी घेतली. 

 

टॅग्स :ShivshahiशिवशाहीSilverचांदी