शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

लोकसहभागातून खोदल्या ६० बोअरवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 1:26 AM

गाव पातळीवर पाणी समस्येचे निराकरण करण्याकरिता गटागटाने एकत्र येऊन लोकांनी लोकांकरिता, लोकसहभागातून गावात चक्क ६० हून अधिक बोअरवेलची निर्मिती केली आहे. यातून स्वत:ची पाणी समस्या त्यांनी स्वत:च सोडवली आहे. गावात इतरांनाही ती सहायक ठरली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाणीटंचाईवर अशीही मात, स्वत:च बनविली पाणी वापर संहिता

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गाव पातळीवर पाणी समस्येचे निराकरण करण्याकरिता गटागटाने एकत्र येऊन लोकांनी लोकांकरिता, लोकसहभागातून गावात चक्क ६० हून अधिक बोअरवेलची निर्मिती केली आहे. यातून स्वत:ची पाणी समस्या त्यांनी स्वत:च सोडवली आहे. गावात इतरांनाही ती सहायक ठरली आहे. लोकसहभागातून काय करणे शक्य आहे, याचे उत्तम उदाहरण शिंदीवासीयांनी समाजासमोर ठेवले आहे.अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. या आठ हजार लोकसंख्येच्या गावात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तीनही बोअरवेलची पाणी पातळी खोल गेली आहे. मागील काही वर्षांपासून ही पाणी समस्या कायम आहे. यातून मार्ग काढण्याकरिता गावकरी स्वत: पुढे आलेत. १० ते १५ लोकांचा एक गट या प्रमाणे त्यांनी गट केलेत. प्रत्येक गटाने बोअरवेलकरिता आपसात स्वतंत्र वर्गणी केली. बोअरवेल पूर्ण करून घराघरांत पाणी घेताना येणारा खर्च वाटून घेतला.तीन ते चार वर्षांपासून या गटनिर्मितीतून बोअरवेल निर्मितीच्या प्रक्रियेने शिंदी बु. मध्ये वेग पकडला. यातून ५ हजार लोक आत्मियतेने जुळले गेले. ज्यांच्याकडे जागा असेल त्यांच्या अंगणात आणि ज्या गटाकडे जागा नसेल त्यांनी रस्त्याच्या कडेला घराशेजारी सामूहिक बोअरवेल घेतल्या आहेत.अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे लोकसहभागातील ६० बोअरवेल आहेत. यात सरासरी १५ लोकांच्या एका गटाने एका बोअरवेलची निर्मिती केली. गावातील ६० बोअरवेलने गावातील पाच हजाराहून अधिक लोकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे.पाणी वापर संहितापाणीटंचाईवर मात करण्यारिता लोकसभागातून ग्रामस्थांनी बोअरवेल खोदून पाणी उपलब्ध करून घेतले असते. परंतु या बोअरवेलचे पाणी वापरण्याकरिता त्यांनी स्वत: पाणी वापर संहिता अंगिकारली आहे. यात गरजेपूरताच पाण्याचा वापर करत आहेत. ठरल्याप्रमाणे आठवड्यातून ते एकदिवस, कोरडा दिवसही पाळत आहेत.उत्कृष्ट व्यवस्थापनगटागटाने निर्मित या बोअरवेलचे व्यवस्थापन सामंजस्य व गरजेवर आधारित आहे. गटात सहभागी प्रत्येकाच्या घरी त्या बोअरवेलचा केबल आणि कॉकसह पाईप देण्यात आला. ज्याला पाण्याची गरज आहे, तो घरूनच बोअरवेलची बटन दाबतो. बोअरवेल सुरु करून पाणी घेतो. पाणी भरणे झाले की कॉक, बटन बंद करतो. यासाठी वेळ आणि दिवसही वाटून घेतले आहेत. वीज केबल प्रत्येकाच्या मीटरपर्यंत गेल्यामुळे वीज बिलाचाही प्रश्न नाही. वापरानुसार रक्कम वीजदेयकात समाविष्ट होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई