पक्षपात : पिण्यासाठी ६८.१६, विद्युत प्रकल्पाला ८८ दलघमी प्रदीप भाकरे अमरावतीमार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असताना जिल्ह्यात मात्र, पेयजल आणि सिंचनाच्या तुलनेत सोफिया विद्युत प्रकल्पाला पाणी वाटपात झुकतेमाप दिले जात आहे. ऊर्ध्व वर्धा धरणातून पिण्यासाठी ६८.१६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित असताना एकट्या सोफियासाठी ८७.६० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आल्याने जलवितरणात पक्षपात केल्याच्या आरोपाला बळ मिळत आहे. तुर्तास उर्ध्व वर्धा (अप्पर वर्धा) प्रकल्पात केवळ ३१ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने सोफियासाठी आरक्षित पाण्याचा प्रश्न चर्चिला जात आहे. २८ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्याचा पाणीपुरवठा एकीकडे तर सोफियासाठी आरक्षित पाणी दुसरीकडे, अशी सध्याची स्थिती आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी यंदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ४४ दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी केली आहे. त्या खालोखाल २४ दशलक्ष घनमीटर पाणी एकट्या सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी लागणार आहे.शहरापेक्षा अधिक पाणी सोफियालाअमरावती : जिल्ह्यासाठी अप्परवर्धा प्रकल्पातून ६८.१६ दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित असले तरी २८ लाख लोकसंख्येच्या अमरावती जिल्ह्यासाठी आरक्षित पाण्यापेक्षा अधिक अर्थात ८७.६० दलघमी पाणी सोफियासाठी आरक्षित करण्यात आले आहे. अमरावती शहरासाठी जीवन प्राधिकरणाने ऊर्ध्व वर्धा धरणातून ५८.४७ द.ल.घ.मी. पाण्याचे आरक्षण नोंदविले आहे. त्यापैकी सन २०१५-१६ मध्ये मजिप्राकडून ४४ द.ल.घ.मी. पाण्याची मागणी करण्यात आली. त्या तुलनेत एकट्या सोफिया पॉवर कं. लि. ला ८७.६० द.ल.घ.मी.पाण्याचे आरक्षण मंजूर आहे. त्यापैकी यंदा २४ द.ल.घ.मी.पाणी त्यांना लागणार आहे. सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला शासन निर्णयानुसारच पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाला २३२.१८ कोटी सोफियाकडून घ्यावयाचे होते. त्यापैकी ११६ कोटी रूपये प्राप्त झाल्यानंतर कंपनीने कराराचा भंग केला आहे. - अविनाश कोठाळे, सहाय्यक अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, अमरावती.२३,२१८ हेक्टर सिंचनाचे पाणी सोफियालाऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून ८७.६० दलघमी पाणी २२ फेब्रुवारी २००८ च्या निर्णयान्वये सोफियासाठी आरक्षित करण्यात आले. या जलसाठ्यातून जिल्ह्यात तब्बल २३,२१८ हेक्टर अर्थात ५८,०४५ एकर जमिनीचे सिंचन होऊ शकले असते. मात्र, लाखो शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शासनाच्या या निर्णयामुळे सोफियाच्या वाट्याला आले आहे. आंदोलन पेटण्याचे संकेतयंदा प्रथमच ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. १० मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार तुर्तास अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये १८०.१४ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. त्या तुलनेत सन २०११ मध्ये ३४१.८७, सन २०१२ मध्ये २१८.०६, सन २०१३ मध्ये २२६.४४, सन २०१४ मध्ये २६५.०७ तर सन २०१५ मध्ये २२०.८४ दलघमी पाणी होते. यंदा अप्पर वर्धा धरणात निम्मेच पाणी शिल्लक असल्याने सोफियाच्या पाण्यावरून आंदोलनाचे संकेत आहेत. या गावांना होतो पाणीपुरवठाअप्पर वर्धा धरणातून पिण्यासाठी ६८.१६ दलघमी पाणी आरक्षित आहे. यातून अमरावती शहर, मोर्शी, वरुड, मोर्शी तालुक्यातील ७० गावे पाणीपुरवठा योजना, लोणी व १४ गावे पाणीपुरवठा योजना, हिवरखेड व ११ गावे योजना, आष्टी, पेठ, अहमदपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि पांढुर्णा नगरपरिषद भागात पाणीपुरवठा होतो. त्यापेक्षा अधिक पाणी सोफियासाठी आरक्षित केले आहे. सोफियाचे पाणी आरक्षण अद्यापही कायम आहे. शासनाने द्राविडीप्राणायाम बंद करावा. पाण्याचे आरक्षण रद्द करावे. आमच्या आंदोलनामुळे सोफियाला एकच जलवाहिनी कार्यान्वित करता आली. पाणी आरक्षण रद्द न झाल्यास आंदोलन उभारले जाईल.-संजय कोल्हे, निमंत्रक, किसान एकता मंच.
५८ हजार एकर सिंचनाचे पाणी ‘सोफियाला’ !
By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST