शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

५५ टक्के विद्यार्थ्यांची भाषा अप्रगत

By admin | Updated: January 5, 2016 00:02 IST

जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीमधील तब्बल ५५ टक्के विद्यार्थी मराठी भाषेत अप्रगत असल्याचा खळबळजनक निष्कर्ष पायाभूत चाचणीनंतर घेतलेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

पायाभूत चाचणीचा प्रातिनिधिक निष्कर्ष : गणितही कच्चे, फेब्रुवारीमध्ये होणार पुन्हा एक चाचणीप्रदीप भाकरे अमरावतीजिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीमधील तब्बल ५५ टक्के विद्यार्थी मराठी भाषेत अप्रगत असल्याचा खळबळजनक निष्कर्ष पायाभूत चाचणीनंतर घेतलेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये जिल्ह्यातील खासगी, जिल्हा परिषद, मनपा, न.पा. तथा सीबीएसई, आयसीएसई माध्यमातील इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर हे निष्कर्ष काढण्यात आलेत. जिल्ह्यातील ४५ टक्के विद्यार्थ्यांनाच मराठी व गणित या दोन विषयांचे बऱ्यापैकी ज्ञान आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत घट झाल्याने प्राथमिक शिक्षणाचा दर्जा तपासण्याचे शासनस्तरावरुन ठरविण्यात आले. त्यासाठी इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांच्या गणित व भाषा विषयामधील क्षमता जाणून घेण्यात आल्या. पायाभूत चाचणीचे संपादनअमरावती : सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या पायाभूत चाचणीमध्ये मोठे गैरप्रकारही उघड झाले होते. जिल्ह्यातील सव्वालाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतल्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधिक स्वरुपात त्यांनी दत्तक घेतलेल्या शाळांमधील पायाभूत चाचणीचे संपादन करुन निष्कर्ष नोंदविले. त्यात जिल्ह्यातील तब्बल ५५ टक्के विद्यार्थी मराठी भाषेमध्ये अप्रगत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. जिल्ह्यातील केवळ ३८.१२ टक्के विद्यार्थ्यांना मजकुराचे श्रृतलेखन करता आले. तर ३१.६१ टक्के विद्यार्थी व्याकरणावर आधारीत प्रश्न सोडवू शकले. याशिवाय केवळ ३०.०२ टक्के विद्यार्थी स्वत:च्या शब्दात लेखी अभिव्यक्ती करु शकले. या निष्कर्षावरुन जिल्ह्यातील विद्यार्थी मराठी भाषेमध्ये अप्रगत असल्याचे दिसून आले आहे. २९ हजार ८९७ विद्यार्थ्यांचा अभ्यास पायाभूत चाचणी पार पडल्यानंतर जिल्हा व प्रशिक्षण संस्थेने दत्तक घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या ४६१ शाळांचा अभ्यास करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांपैकी या शाळांचे प्रमाण ३० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण पटसंख्येच्या २५ टक्के प्रमाण असलेल्या २९,८९७ विद्यार्थ्यांचे यात निरिक्षण नोंदविले गेले. पायाभूत चाचणी झाल्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात निष्कर्ष काढण्यात आले. सर्वच माध्यमातून घेतली गेली पायाभूत चाचणीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत सीबीएसई, आयसीएसईसह राज्य शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या दुसरी ते आठवीच्या वर्र्गातील विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी सप्टेंबर २०१५ मध्ये घेण्यात आली. राज्यात शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘गुणवत्ता केंद्रबिंदू’ मानून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. गणितात सरासरी ५० टक्के विद्यार्थी प्रगतजिल्ह्यात सप्टेंबर १५ मध्ये घेण्यात आलेल्या गणितातील पायाभूत चाचणीमध्ये सरासरी ५० टक्के विद्यार्थी प्रगत ठरले आहेत. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची तोंडी/प्रात्यक्षिक आणि लेखीच्या माध्यमातून गणिताची पायाभूत चाचणी (बेसलाईन टेस्ट) घेण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेव्दारे दत्तक घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित चाचणीतील संपादणुकीचा अभ्यास करण्यात आला. ज्या शाळा पायाभूत चाचणीत कमी पडल्यात, तेथे कृती कार्यक्रम राबविला जाईल. - पवन मानकर, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.