शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

५४९ तळीरामांची घरपोच दारूसाठी ऑनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शासनादेशानुसार शहरातही घरपोच दारू सुविधा या ऑनलाईन उपक्रमाला मान्यता दिली. एक्साईकडून अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. सोमवारी सहा वाईन शॉप आणि एका बिअर शॉपीतून ५४९ जणांनी दारूसाठी ऑनलाईन बुकींग केली. ही बुकींग सकाळी १० ते दुपारी ३ वाजता दरम्यान करण्यात आली.

ठळक मुद्देथेट विक्री नाही : आजपासून ३४ दुकानांतून सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात सात दुकानांतून सोमवारपासून घरपोच दारू सुविधा सुरू झाली. पहिल्याच दिवशी ५४९ तळीरामांनी दारूसाठी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती आहे. केवळ दारू पिण्याचा परवाना असलेल्यांनाच घरपोच दारू मिळाली, हे विशेष. मंगळवारपासून १८ वाईन शॉप, १६ बिअर शॉपीतून ऑनलाईन नोंदणीअंती घरपोच दारू मिळविता येणार आहे.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शासनादेशानुसार शहरातही घरपोच दारू सुविधा या ऑनलाईन उपक्रमाला मान्यता दिली. एक्साईकडून अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. सोमवारी सहा वाईन शॉप आणि एका बिअर शॉपीतून ५४९ जणांनी दारूसाठी ऑनलाईन बुकींग केली. ही बुकींग सकाळी १० ते दुपारी ३ वाजता दरम्यान करण्यात आली. बडनेरा शहरात एकमात्र वाईन शॉपी सुरू असल्याने दारू घेण्यायासाठी चिक्कार गर्दी झाली होती. मात्र, वाईन संचालकांनी थेट दारू मिळणार नाही, सोशल मीडियावर बुकींग करूनच दारू घरपोच मिळेल, असे फलक लावले होते. स्थानिक नवाथेनगर, दसरा मैदानसमोर, रूक्मिणीनगर, राजापेठ, दस्तुरनगर, कंवरनगर, चैतन्य कॉलनी येथील दारू दुकानांसमोर थेट दारू विकत घेण्यासाठी तळीरामांनी गर्दी केली होती. एक दिवस दारू पिण्याच्या परवान्यासाठी ५ रुपये शुल्क आकारले जात आहे. सोमवारी ५१० जणांनी दारु पिण्यासाठीचे आॅनलाईन परवाने मिळविले आहेत.परवान्याशिवाय घरपोच दारू नाहीअमरावती व बडनेरा शहरात १८ वाईन आणि १६ बिअर शॉपीमधून ऑनलाईन दारू बुकींग करता येणार आहे. दारू विक्री दुकांनाबाहेर ठळक अक्षरात व्हॉट्सअप, भ्रमणध्वनी, मॅसेज आणि फोन नंबर संपर्कासाठी आहेत. तळीरामांना या क्रमांकावर संपर्क साधून दारू बुकींग करावी लागेल. त्यानंतर डिलेव्हरी बॉय घरपोच दारू आणून देणार आहे. त्याकरिता दारू पिण्याचा परवाना आवश्यक असणार आहे. परवान्याशिवाय घरपोच दारू मिळणार नाही, असे एक्साईजचे अधीक्षक राजेश कावळे म्हणाले.