शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
5
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
6
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
7
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
8
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
9
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
10
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
11
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
12
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
13
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
14
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
15
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
16
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
17
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
18
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
19
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
20
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

५४ हजार आॅनलाईन नोंदणी, १९ हजार शेतकऱ्यांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:32 IST

नाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा तूर खरेदीचा करारनामा झाला, त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत.

ठळक मुद्देतूर खरेदीला निकषाची बाधा : जिल्हा उत्पादकतेच्या २५ टक्केच खरेदीचा फतवा

आॅनलाईन लोकमतअमरावती : नाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा तूर खरेदीचा करारनामा झाला, त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत. यामुळेच जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४,७१८ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात १९७४७ शेतकऱ्यांची तीन लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील १२ केंद्रांवर नाफेडद्वारा शासकीय सुरू आहे. गतवर्षी तुरीची सरासरी उत्पादकता हेक्टरी १५ क्विंटल ग्राह्य धरण्यात आली होती. त्यातुलनेत यंदा मात्र १० क्विंटलच ग्राह्य धरण्यात आल्यामुळे अधिक उत्पन्न घेणाºया शेतकºयांवर मात्र अन्याय झाल्याची भावना आहे. आता जिल्हा उत्पादकतेच्या म्हणजेच १२ लाख क्विंटलच्या तुलनेत केवळ चार लाख क्विंटलच तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत डीएमओद्वारा अमरावती, अचलपूर, धारणी ,दर्यापूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व अंजनगाव सूर्जी येथे तर व्हीसीएमएफद्वारा मोर्शी, वरूड व धामणगाव या केंद्रांवर खरेदी सुरू आहे. दरम्यान सर्वच १२ केंद्रावर तुरीची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. आतापर्यत ५४ हजार ७१८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे.शासनाच्या निर्देशाप्रमाणे यंदा नाफेडच्या केंद्रावर १८ एप्रिल २०१८ पर्यंत तूर खरेदीला मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने तूर खरेदीचे दिलेले लक्षांक पूर्ण होईतोवर ही खरेदी सुरू राहणार आहे.जर नाफेडकडून तूर खरेदी बंद करण्याचे निर्देश आल्यास केंद्र त्वरित बंद करण्यात येणार आहे. सातबारावर निर्देशित केल्याप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येणार असली तरी एका दिवशी एका शेतकºयांकडून प्रति ५० किलोचे ५० पोत्यांचीच खरेदी करण्याचे आदेश आहेत.अशी आहे केंद्रनिहाय नोंदणीसद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ८११२, अमरावती ७१६२, अंजनगाव सुर्जी २४८१, चांदूरबाजार ४,०१८, चांदूर रेल्वे ३८१४, दर्यापूर ५३४५, धारणी ७८२, नांदगाव खंडेश्वर ३०५०, तिवसा २१८७, मोर्शी ६३८१, धामणगाव रेल्वे ४७८६ व वरूड तालुक्यात ६५९४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.अशी आहे केंद्रनिहाय खरेदीसद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर २७,८८८ अमरावती ४६६०३, अंजनगाव सुर्जी, १७,५४७ चांदूरबाजार २३५४६, चांदूररेल्वे २३९९५, दर्यापूर ५०३६८, धारणी ७०१२, नांदगाव खंडेश्वर १४,४९७, तिवसा १५६०६ ,धामणगाव २०५२५, मोर्शी ३०२७८ व वरुड तालुक्यात २८८३१ क्विंटल खरेदी करण्यात आली.