शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

51 फुटांच्या रावण पुतळ्याचे अंबानगरीत दहन, अमरावतीकरांनी केली तोबागर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 20:33 IST

विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर  शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली.  

अमरावती : विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर  शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली.   विश्व हिंदू महासंघाचे अध्यक्ष तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष महंत मुकेशनाथ व महामंत्री हेमेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्हाध्यक्ष आशीष राठी यांनी रावण दहनाचा कार्यक्रम यशस्वी केला. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रत्यंचा ताणून रावणाच्या दिशेने बाण सोडला आणि क्षणार्धात रावण दहन झाले.   यावेळी मंचावर कार्यक्रम अध्यक्ष नितीन धांडे, प्रमुख अतिथी महंत मुकेशनाथजी, हेमेंद्र जोशी, आ. सुनिल देशमुख, नितीन देशपांडे, महापौर संजय नरवणे, महापालिका आयुक्त हेमंत पवार, माजी आमदार जगदीश गुप्ता, शिवसेनेचे सुनिल खराटे, सरिता सोनी, राजु राठी, पदमा खानझोडे, प्रदिप शिगोंरे, सिमेश श्राफ, विनोद लखोटिया, राजाभाऊ खारकर, किशोर जाधव, विशाल कुळकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सुनील अग्रवाल, तर संचालन माधुरी छावसरीया यांनी केले. नियोजनबध्द बंदोबस्त-रावण दहन कार्यक्रमास काही महिला संघटनांनी विरोध दर्शविला होता. कार्यक्रमस्थळी विरोध होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बंदोबस्ताचे विशेष नियोजन केले होते. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या नेत्तृत्वात ठाणेदार मनीष ठाकरे, अर्जुन ठोसरे, पंजाब वंजारी यांच्यासह पोलिसांनी सुनियोजीत बंदोबस्त लावल्याने अतिशय  उत्साहात रावण दहन पार पडले. रावण दहन विरोधी संघर्ष समितीच्या महानंदा टेकाम यांच्यासह २० ते २५ महिलांनी रावण दहनाला विरोध दर्शवून जयस्तंभ चौकाजवळ घोषणाबाजी केली. त्यामुळे शहर कोतवाली पोलिसांनी कार्यक्रम संपेपर्यंत महिलांना ताब्यात घेतले होते.