शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ४८.५१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:17 PM

२८ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ३९.६२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ५८.२८ टक्के पाणीसाठा आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती दोन आठवड्यात चांगली सुधारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंदीप मानकर

अमरावती : गेल्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली. दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पश्चिम विदर्भात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे सद्यस्थितीत लघु, मध्यम व मोठ्या अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ४८.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांचा सरासरी पाणीसाठा ५०.७५ टक्के झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.सरासरी ५० टक्के पाणीसाठा म्हणजे किमान एक वर्षांची तरी पिण्याच्या पाण्याची सोय झाली असून, काही प्रकल्पांमध्ये अद्याप अपेक्षित पाणीसाठा नसल्याने त्या भागातील नागरिकांची चिंता कायम आहे. २८ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ३९.६२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ५८.२८ टक्के पाणीसाठा आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती दोन आठवड्यात चांगली सुधारली आहे. ५०.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांचा पाणीसाठा वाढत असल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असल्याचे मत जलतज्ज्ञांनी वर्तविले आहे. परतीच्या पावसात मोठे प्रकल्प भरतात, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ५०२ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३१७४.११ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा १५३९.६७ दलघमी आहे. त्याची सरासरी टक्केवारी ४८.५१ इतकी आहे.नऊ मोठ्या प्रकल्पांत ५०.७५ टक्के पाणीसाठाअमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पात ६५.२६ टक्के पाणीसाठा आहे. मध्यप्रदेशात चांगला पाऊस झाल्याने नद्यांना आलेल्या पुरामुळे वर्धा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे अमरावती शहरवासीयांची पाण्याची समस्या मिटली आहे. आणखी धरण भरल्यास सिंचनाचाही प्रश्न सुटणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस या मोठ्या प्रकल्पात ४०.०७ टक्के पाणीसाठा आहे. अरूणावती १२.२४ टक्के, बेंबळा ७८.४८ टक्के पाणीसाठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ९.४५ टक्के, वान ८५.२२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २३.३७ टक्के, पेनटाकळी ७७.५७ टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात बिकट पाणीटंचाई निर्माण झाली होती. दोन प्रकल्पांमध्ये यंदा पाणीसाठा वाढल्यामुळे काही प्रमाणात टंचाईवर मात शक्य होणार आहे.

२४ मध्यम प्रकल्पांची स्थितीअमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ८७.८४ टक्के पाणीसाठा साचला असून, ५ सें.मी.ने ४ गेट उघडण्यात आले आहेत. चंद्रभागा ९१.०३ टक्के पाणीसाठा असून, ५ सें.मी.ने ३ गेट उघडले आहे. पूर्णा प्रकल्पात ८७.४२ टक्के पाणीसाठा असून, २० सेंमीने दोन गेट उघडण्यात आले आहे. सपन प्रकल्पात ९१.५० टक्के पाणीसाठा असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस मध्यम प्रकल्पात ८८.४३ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ४९.८९ टक्के, वाघाडी ५०.५९ टक्के, बोरगाव ७३.२२ टक्के नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा १६.६४ टक्के, मोर्णा २२.९९ टक्के. उमा १०.५३ टक्के, घुगंशी बॅरेज शून्य टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ८.२१ टक्के सोनल १६.२५ टक्के, एकबुर्जी ४१.८५ टक्के, बुलडाणा जिल्हा ज्ञानगंगा ८७.५६ टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ४८.७१ टक्के, तोरणा ७५.२९ टक्के उतावळी ४४.१६ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी