शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चिंता मिटली; पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ६८.२० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 20:33 IST

दोन मोठे प्रकल्प १०० टक्के : पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला

संदीप मानकर/अमरावती : गेल्या दोन आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक तथा दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ  झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, १२ सेंमीने ११ दारे उघडण्यात आली आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यतील बेंबळा प्रकल्पातसुद्धा शंभर टक्के पाणीसाठा साचला असून, २५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. २२ सप्टेंबरला सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६८.२० टक्के पाणीसाठा असल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी काही प्रकल्पांत अद्यापही अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. परतीच्या पावसात प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७५.९१ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४९.७२ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात  सर्वात कमी १३.९१ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३४.३३ टक्के, वान ९६.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४६.४४ टक्के, पेनटाकळी ९७.१० टक्के, खडकपूर्णा ४९.७८ टक्के पाणीसाठा साचला आहे. वान प्रकल्पाचे १५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली आहेत. ४६९ लघु प्रकल्पांचाही पाणीसाठा वाढत असून ५४.७० टक्के पाणीसाठा साचला आहे. ५०२ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी एवढा असून आजचा  उपयुक्त पाणीसाठा हा २१६४.७५ दलघमी आहे. 

२४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७४.१४ टक्के पाणीसाठाअमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा साचला आहे. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के,  पूर्णा प्रकल्पात ९२.७९ टक्के, सपन ९६.२७ टक्के  पाणीसाठा साचला असून, जिल्ह्यातील चारही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पात ९९.१६ टक्के  पाणीसाठा आहे. सायखेडा १०० टक्के, गोकी ५३.०६ टक्के, वाघाडी ८४.४२  टक्के, बोरगांव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा ६१.८७ टक्के, मोेर्णा ५१.०६ टक्के, घुंगशी बॅरेज २.०८ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात ३१ टक्के, सोनल ५२.६० टक्के, एकबुर्जी ५४.८७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ७३.१४  टक्के, तोरणा १०० टक्के, उतावळी ९८.१३  टक्के पाणीसाठा साचला आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भwater shortageपाणीकपात