शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

होमगार्डला दिवसाला ५०० रुपये मानधन; १४५० जागांसाठी १८ हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:40 IST

Amravati : दोन दिवसांत अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता

मोहन राऊत लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : राज्यात सध्या होमगार्ड भरती सुरू आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये १४५० जागांसाठी भरती होत आहे. यासाठी जिल्ह्यातून तब्बल १८ हजार ५६३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परंतु होमगार्ड निवडीची अंतिम यादी अद्यापही जाहीर होणे आहे.

सगळ्याच क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येने रिक्त जागा आहेत. परंतु, त्या भरण्यासाठी शासनाकडून वेळीच हालचाली होत नाहीत. पोलिस विभागाचा महत्त्वाचा घटक म्हणून होमगार्डची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. विविध राष्ट्रीय सण, उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी पोलिसांच्या मदतीला होमगार्ड खडा पहारा देत उभे असतात. या काळात जिवाची पर्वा न करता होमगार्ड राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतात. जिल्ह्यामध्ये १४५० होमगार्डची भरती होत असून पोलिस विभागाला मदत होणार आहे.

जिल्ह्यात होमगार्डच्या हजारो जागा रिक्त जिल्ह्यात होमगार्डच्या हजारो जागा आजघडीला रिक्त आहेत. परंतु, शासनस्तरावरून १४५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

लवकरच अंतिम यादी मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये सहावीत 7 हजार रूपये जिल्ह्यात होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून अर्जाची छाननीही पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

उमेदवारांना अंतिम यादीची प्रतीक्षा जिल्ह्यात होमगार्ड पदासाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून अर्जाची छाननीही जवळपास पूर्ण झाली आहे. आता उमेदवारांना अंतिम यादीची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

महिलांसाठी किती जागा आरक्षित? जिल्ह्यात १४५० जागांपैकी महिलांसाठी ६५० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत जिल्ह्यातून महिला उमेदवारांचे अर्ज मोठ्या संख्येने आहेत.

१८ हजार ५६३ अर्ज जिल्ह्यात १४५० होमगार्ड पदांसाठी भरती सुरू आहे. त्यामध्ये महिलांच्या ६५० जागा भरण्यात येत आहेत. आजपर्यंत मुदतीअंती जिल्ह्यातून १८ हजार ५६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत

कोणती कागदपत्रे आवश्यक? रहिवासी पुरावा, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र (आवश्यक) जन्म दिनांक पुराव्याकरिता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खासगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, तीन महिन्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

"उमेदवाराकडून आक्षेप मागविण्यात आले होते. त्याचे निराकरण झाल्यावर दोन दिवसांत होमगार्ड निवडीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल."- पंकज कुमावत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अमरावती 

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस