जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या दुसरऱ्या लाटेचा संसर्ग कमी होत असता तरी संभाव्या दुसरऱ्या लाटेचा धोका कायम आहे. परिणामी लसीकरणालाही गती आली आहे. नोकरी शिक्षण यासह महत्त्वाच्या कामासाठी दोन्ही डोस घेणे बंधनकारक केल्यामुळे १८ ते ४४ या वयोगटात लसीकरणालाही गर्दी होत आहे. ३१ आऑगस्टपर्यंत १०,९८,७३३ जणांनी लस घेतली आहे. त्यात ७ लाख ९१ हजार ४५१ नागरिकांनी पहिला डोस, तर ३ लाख ७२ हजार ८२ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, ४९ हजारांवर नागरिकांनी पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोससाठीची मुदत संपल्यानंतरही डोस घेतलेला नाहीत. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावरही दुसरा डोस घेण्यासाठी अशांची धडपड होत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर ठरवून दिल्याप्रमाणे लसीचा पुरवठा होतो. त्या काहींना डोस मिळतात, तर काहींना आल्यापावली परत जावे लागल्याचे चित्र आहे. शासनाने नि:शुल्क उपलब्ध केलेल्या लसीसाठी नागरिकांनी पूर्वी प्रचंड गर्दी केली. नंबर लावण्याकरिता रांगेत उभे राहत होते. मात्र आता गर्दी ओसरल्याने सहज उपलब्ध होत असताना लसीकरणाकडे नागरिक पाठ देताना दिसून येत आहे.
दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यककोरोनापासून सुरक्षिततेसाठी शासनाकडून लसीकरण मोहीम जिल्ह्यातील विविध केंद्रावर राबविली जात आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोविशिल्ड -८४ व कोव्हॅक्सिन २८ दिवसांनी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणेही नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी आवश्यक आहे.
लस न घेण्यामागे नेकमी अडचण काय?आरोग्य विभागाच्यावतीने शहर व जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम गत काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, सुरुवातीला लसीसाठी प्रतिसाद अल्प होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेचा धसका घेत नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी लस घेण्यासाठी कल वाढला. अशातच लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा असतो. कधी लस मोजक्याच असतात. अशावेळी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना तसेच परत जावे लागते. अशा अडचणींचा सामना दरम्यान अनेकांना करावा लागला.