शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

जिल्ह्यात ४५ मातांचा प्रसूतीनंतर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोना काळात जिल्ह्यात वर्षभरात ४५ मातांचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे झालेली आहे. गरोदरपणात ...

अमरावती : कोरोना काळात जिल्ह्यात वर्षभरात ४५ मातांचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे झालेली आहे. गरोदरपणात आजार वाढले असताना कोरोना काळात योग्य औषधोपचार होऊ न शकल्याने काही गर्भवती मातांचा, तर काही प्रसूतांचा मृत्यू झाला. यात मेळघाटातील १५ व अमरावतीतील २४ मातामृत्यूची संख्या नोंदविण्यात आली आहे. प्रसूतीदरम्यान विविध आजारांवर उपचार सुरू असतानाच २४ मार्च २०२० पासून देशात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे अनेकांना वेळेवर औषधोपचार मिळू शकले नाही. तसेच पैशांची तजजोड होऊ न शकल्यामुळे व गावखेड्यांतून वाहनांची सुविधा उपलब्ध न होऊ शकल्याने अनेकांना कोरोना काळात संघर्ष करावा लागला.

तालुकानिहाय मृत्यूच आकडेवारी

महिना एकूण प्रसूती सिझेरियन नॉर्मल मृत्यू

एप्रिल

बॉक्स

मे महिन्यात सर्वाधिक आठ मृत्यू

मे २०२० मध्ये कोरोनाची अत्यंत दहशत निर्माण झाल्याने सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू होते. तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू केल्याने किडनीच्या रुग्णांना सुविधा मिळू शकल्या नाहीत. यातच चिखलदरा येथील प्रसूता उर्मिला अखंडे यांचा १८ मे रोजी मृत्यू झाला.

रक्तदाब सर्वात मोठे कारण

प्रसूतीदरम्यान महिलांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. कुणाची पहिलीच प्रसूची असल्याने या संकटाला सामोरे जाताना त्यांचा रक्तदाब वाढतो. अशाच कपॅसिटी लेव्हल कमी असणाऱ्या मातांना वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचा प्रकार मेळघाटात अधिक प्रमाणात घडला.

कोट

कोरोनाचा परिणाम नाही. मात्र काही रुग्ण अत्यंत जोखमीच्या वेळेत उपचारार्थ दाखल होतात. तेव्हा उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यास नागपूर वा इतरत्र हलवावे लागतात. दरम्यान शर्थीच्या प्रयत्नानंतरही काही प्रमाणात मृत्यूच्या घटना घडतात.

- मंगला गहरवाल,

स्त्रीरोग प्रभारी विभागप्रमुख, डफरीन हॉस्पिटल

बॉक्स

डफरीन रुग्णालयात सात मातामृत्यू

जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) सन२०१६-१७ मध्ये ६ मातांचा मृत्यू झाला. २०१७-१८ मध्ये ६, स२०१८-१९ मध्ये ७, २०१९-२० मध्ये ५, तर२०२०-२१ मध्ये ७ मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली.

महिनानिहाय मातामृत्यू

एप्रिलमध्ये २, मे ८, जून ५, जुलै ६, ऑगस्ट ७, सप्टेंबर ४, ऑक्टोबर ४, नोव्हेंबर ३, डिसेंबर ४, जानेवारीमध्ये २ असे ४५ मातामृत्यू झालेले आहे.