शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

४४ प्रवासी मृत्यूच्या दारात पण रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वाचविले प्राण

By गणेश वासनिक | Updated: December 30, 2023 17:18 IST

मध्य रेल्वेत ‘मिशन जीवन रक्षक’ मोहीम, एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ दरम्यानच्या विविध घटना

अमरावती : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्मचारी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर आहेत. २४ तास जागरूक हे त्यांच्या कर्तव्याची उद्दिष्टे आहेत. मात्र एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ४४ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.मध्य रेल्वे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवान ‘मिशन जीवन रक्षक’ या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रवाशांच्या मदतीला धावून जातात. आरपीएफने ज्या प्रवाशांचे प्राण वाचविले, त्या घटनांचे दृष्य वृत्तपत्र वा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आणि विविध समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या ४४ घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात जीव वाचविणाच्या एकूण २१ घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात १५, पुणे विभागात ४, तर नागपूर विभागात २ आणि सोलापूर विभागात दोन जीव वाचविण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.रेल्वे सुरक्षा बलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे मध्ये आणि रेल्वे परिसरात अमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळविणे आदी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्याप्रमाणे ते आपले लक्ष प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रित करून असतात.धावत्या ट्रेनमध्ये चढणे, उतरणे अथवा आत्महत्येचा प्रयत्नातून जीव वाचविलेरेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने विविध प्रकरणांमध्ये प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. यात प्रवासी काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोका पत्करतात. काहीवेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करतानादेखील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी लोकांचे जीव वाचविले आहे. शेवटी एखाद्याचा जीव वाचविण्याच्या या कृतीचा रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांप्रती आनंद आणि कृतज्ञता वाढवतो.ट्रेन सुटण्याच्या वेळापत्रकाच्या अगोदर स्थानकावर पोहोचण्याचा प्रयत्न करावा. प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू अथवा उतरू नये व जीव धोक्यात घालू नये. रेल्वे प्रवासाचे नियोजन करावे.शिवाजी मानसपुरे,जनसंपर्क अधिकारी, भुसावळ मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वे