शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अमरावती स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तब्बल ४३५ किलो गांजा जप्त, चार आरोपी ताब्यात

By गणेश वासनिक | Updated: September 3, 2022 17:49 IST

मालखेड गार्डन फाट्याजवळ पकडला ट्रक, पेट्रोलिंग कार

चांदूर रेल्वे (अमरावती) : जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय पथकाने शनिवारी सकाळी ट्रकमधून वाहून नेला जात असलेला तब्बल ५२ लाख रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या ट्रकला मागे-पुढे पेट्रोलिंग करणारी दोन वाहनेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली.

पेट्रोलिंग करीत असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात गोपनीय माहितीवरून चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड गार्डन फाट्याजवळ ही कारवाई केली. यात एकूण ४३५ किलो गांजा पथकाने पकडला. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. वृषभ मोहन पोहोकार (२५, रा . रिद्धपूर, ता . मोर्शी), विक्की बस्तीलाल युवनाते (२०, रा. शिरजगाव कसबा, ता. चांदूर बाजार), शेख अरबाज शेख इलियास, (१९, रा. आझादनगर, अमरावती), शेख तौसिफ शेख लतीफ, (१९, रा. रतनगंज, खुर्शीदपुरा, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

ते आंध्र प्रदेशातून पांढरकवडा-यवतमाळ-बाभूळगाव-चांदूर रेल्वे मार्गे अमरावती येथे ट्रकमधून गांजाची वाहतूक करीत होते. पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी नाकाबंदी करून पथकामार्फत वाहन थांबविले. यावेळी सीजी १२ बीई ५७६१ क्रमांकाच्या एका ट्रकमध्ये रिकाम्या प्लास्टिक क्रेटखालून ५५ खाकी ठोकळे व पोत्यांमधून ५२ लाख २० हजार ६०० रुपयांचा गांजा होता. या ट्रकसह एमएच १२ डीएच ५७५७ आणि एमएच ४९ एटी ०४४८ क्रमांकाच्या दोन कार ताब्यात घेतल्या. एकूण ७४ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो चार आरोपींसमवेत चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास चांदूर रेल्वेचे पोलीस निरीक्षक विलास कुळकर्णी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थSmugglingतस्करीAmravatiअमरावती