शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रुक्मिणी मातेची ४३१ वर्षांची परंपरा; अमरावतीत पालखीचे जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:06 IST

Amravati : माजी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी केले स्वागत, बियाणी चौकात स्वागताला मोठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या माता रुक्मिणीच्या पालखीचे अंबानगरीत बियाणी चौकात माजी आमदार अॅड. यशोमती ठाकूर, तसेच खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सोहळ्याकरिता सर्वच धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरला.

रुक्मिणी मातेच्या पालखीला ४३१ वर्षांची परंपरा आहे. श्रीक्षेत्र पंढरपूरच्या धर्तीवरच रुक्मिणी मातेचेही शासकीय पूजन व्हावे व श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीप्रमाणेच रुक्मिणी मातेच्या पालखीलाही मानाचे स्थान मिळावे, यासाठी माजी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी भगीरथ प्रयत्न केले होते. त्यानुसार आता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रुक्मिणी मातेचे शासकीय पूजन व सोबतच या पालखीला पंढरपूर येथे मानाची पालखी असा दुग्धशर्करा योग घडून आला आहे.

पालखीत स्वागत सोहळा ठरला सर्वधर्मसमभावाचा सोहळाया सोहळ्यात सर्व समाजातील नागरिक आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे हा पालखी स्वागत सोहळा सर्वधर्मसमभावाचे आणि एकतेचे दर्शन घडवणारा ठरला. सोहळ्याला खा. बळवंत वानखडे, यश खोडके, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, आरडीसी अनिल भटकर, पोलिस उपायुक्त सागर पाटील, अमरावती बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, कल्पना दिवे, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, मनोज देशमुख, प्रवीण मनोहर, प्रकाश काळबांडे, प्रताप भुयार, अमित गावंडे, नितीन कदम, सतीश गोटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बियाणी चौकात भक्तिरसाला उधाणबियाणी चौकात सायंकाळी ७ वाजता रुक्मिणी मातेच्या पालखीचे आगमन होताच माजी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते व भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे जल्लोष आणि भक्तिभावात स्वागत करण्यात आले. पालखी आणि भक्तीरसात तल्लीन झालेले वारकरी, सोबत टाळ-मृदंग आणि मुखात विठ्ठलाचे नाम असा मंगलमय सोहळा पार पडला. हा प्रसंग भाविकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. 

यशोमती ठाकूर यांनी धरला फुगडीचा फेरबियाणी चौकात सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांसोबत यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेर धरला. त्यानंतर ठाकूर यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेतली व वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला

टॅग्स :AmravatiअमरावतीPandharpurपंढरपूर